साप्ताहिक राशिभविष्य

0

साप्ताहिक राशिभविष्य, दि. १९ ते २५ ऑगस्ट २०१८

सामानाची काळजी घ्या
मेष –
आराम करणे अत्यंत गरजेचे आहे. गेले काही दिवस अनेक प्रकारे मानसिक तणावात असल्यामुळे, थोडी मौज-मजा, करमणूक केल्याने तुम्हाला चांगला आराम लाभेल. ग्रुपमध्ये सामील होणे दिलचस्प असेल. पण खर्चिकदेखील ठरेल. विशेषत: तुम्ही जर दुस-यांवर खर्च करणे थांबवले नाही तर तुमचा विश्वास ज्या व्यक्तीवर आहे अशी व्यक्ती तुम्हाला पूर्ण सत्य सांगणार नाही. म्हणून वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी खोदून चौकशी करा. परंतु तुम्ही रागावून विचारणा केलीत तर तुमचे संबंध कायमचे बिघडू शकतात. आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्यावी. तुमचा / तुमची जोडीदार गरज असताना कदाचित तुमच्या कुटुंबीयांपेक्षा तिच्या कुटुंबीयांची अधिक काळजी घेईल आणि त्यांना जास्त महत्त्व देईल.
लकी क्रमांक : ६
विश्रांतीची गरज
वृषभ – ठरावीक काळाने येणारा मानसिक, शारीरिक थकवा काही प्रश्न निर्माण करेल. तुमच्या शरीराची प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी संपूर्ण विश्रांतीची गरज आहे. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्टय़ा फायद्यात राहाल. कौटुंबिक जबाबदा-या या तुमच्या डोक्यावर येतील आणि तुमच्या मनावर दडपण येईल. आशा-आकांक्षा सोडू नका, अपयश हे नैसर्गिक आहे. किंबहुना आयुष्याचे तेच खरे सौंदर्य आहे. जे स्वत:ला मदत करतात त्यांनाच देवही मदत करतो, हे विसरून चालणार नाही. तुमच्या जोडीदाराचे नातेवाईक तुमच्या वैवाहिक आयुष्यातील शांतता भंग करतील.
लकी क्रमांक : ५
स्तुतिसुमने उधळतील
मिथुन – तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. कोणाशी आर्थिक व्यवहार करायचे याची काळजी घ्या. चांगले दिसण्यासाठी तुम्ही जे काही बदल कराल त्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्य वैतागतील. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या कठोर शब्दांनी तुमचे मन बेचैन होईल. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल. तुमचे तुमच्या जोडीदाराशी गंभीर भांडण होईल.                                                                                   लकी क्रमांक :
आजारातून बरे व्हाल
कर्क – प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. व्यवसाय-धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करणा-या लोकांना हाताळणे तुम्हाला खूपच कठीण जाईल. तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा. मजा लुटा. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला सप्ताह. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात, त्याचे अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील.
लकी क्रमांक : ७
अतिखर्च टाळा
सिंह – आयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. चिंता करणे विसरून जाणे हे त्यादृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल. घरातील आलिशान चैनीच्या वस्तूंसाठी अतिखर्च करू नका. पत्नीबरोबर खरेदी करणे आनंददायी ठरेल. एकमेकांना समजून घेणे आणि त्यानुसार वागणे यात वाढ होईल. भूतकाळातील आनंदी क्षणांमध्ये तुम्ही गुंतून जाल. खासगी आणि गोपनीय माहिती कधीही उघड करू नका.
लकी क्रमांक : ५
वेगळा अनुभव मिळेल
कन्या – मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील ज्यामुळे आर्थिक फायदा संभवतो. कुटुंबातील जवळच्या व्यक्ती तुम्हाला डिवचतील आणि तुमच्या मनात द्वेष निर्माण करतील. अशा वेळेस आक्षेपार्ह काही करण्यापेक्षा तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत योग्य प्रकारे पोहोचवा. तुमच्या हृदयाला आवाहन करतील, अशा एखाद्या व्यक्तीशी भेट होण्याचा जबरदस्त योग आहे. परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागलात, तर येनकेनप्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना हा करावाच लागेल. तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे. आरोग्याच्या तक्रारी सुरू होतील.
लकी क्रमांक : ४
सौहार्दपूर्ण संबंध ठेवा
तूळ – तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. ज्यांची किंमत वाढतच जाणार आहे, अशा वस्तूंच्या खरेदीसाठी शुभ आहे. शेजा-याशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल. परंतु, तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा. कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल. तुम्ही भांडणात सहकार्य केले नाही तर तुमच्याशी भांडायला कुणी येणार नाही. संबंध चांगले, सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी प्रयत्न करा. तुमच्या प्रियकर-प्रेयसीच्या अनावश्यक मागण्यांकडे लक्ष देऊ नका. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. तुमच्या जोडीदाराकडून तुम्ही दुखावले जाण्याची शक्यता आहे.
लकी क्रमांक : ६
मानसिक स्पष्टता ठेवा
वृश्चिक – प्रचंड चिंता आणि तणावामुळे तुमची प्रकृती बिघडेल. गोंधळ व नैराश्य टाळा आणि मानसिक स्पष्टता ठेवा. येनकेनप्रकारे आर्थिक लाभ होतील. तुम्ही नेहमी ज्या व्यक्तीवर भरवसा ठेवला ती व्यक्ती तुमच्याशी प्रामाणिक नाही हे समजल्यावर तुम्ही प्रचंड अस्वस्थ व्हाल. शारीरिक अस्तित्व हे आता गौण आहे. तुम्हाला चुकीचा मार्ग दाखविणा-या व्यक्तीवर लक्ष ठेवा किंवा चुकीची माहिती देऊन तुम्हाला हानी पोहोचविण्याची शक्यता आहे. आपल्या सहचरासोबत असणे कसे असते याची तुम्हाला  जाणीव होईल आणि तुमचा / तुमची जोडीदार ही त्यापैकीच एक आहे.                                                          लकी क्रमांक : ८
मतभेद वादविवादाला निमंत्रण देतील
धनु- व्यवस्थित व्यायाम करून तुमचे वजन नियंत्रणात आणण्याची गरज आहे. तेलकट आणि मसालेदार पदार्थाचे सेवन टाळा. तर्कावर आधारित विनोदात आनंद घेऊ नका. मुलांशी असणारे मतभेद वादविवादाला निमंत्रण देतील आणि नैराश्य निर्माण करू शकतील. आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर राहणे खूप कठीण असेल. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. वैवाहिक आयुष्यातील कठीण टप्प्यानंतर थोडासा दिलासा मिळेल.
लकी क्रमांक :५
सप्ताह बहरलेला
मकर-  तुमचा जबरदस्त लवचिकपणा आणि निडरपणा तुमची मानसिक ताकद अधिक वाढविणारा ठरेल. कोणतीही परिस्थिती ओढवली तरी अशी खंबीर भूमिका तुम्हाला ती परिस्थिती तुमच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सहाय्यकारी ठरेल. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आपण ज्यांच्या बरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खूप काही करत असाल तरी ते तुमच्यावर नाराज असतील. खासगी घडामोडी संपूर्ण नियंत्रणाखाली राहतील. खासगी आणि गोपनीय माहिती कधीही उघड करू नका. सप्ताह तुमच्यासाठी वसंतासारखा बहारदार, रोमान्सने भरलेला असेल. ज्यात फक्त तुम्ही आणि तुमचा जोडीदार असे दोघेच असाल.
लकी क्रमांक :
काम कंटाळवाणे होईल
कुंभ- रस्ता क्रॉस करताना विशेषकरून लाल सिग्नल असताना काळजी घ्या. दुस-यांचा निष्काळजीपणा तुम्हाला इजा पोहोचवू शकतो. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. घरगुती कामं कंटाळवाणी होतील आणि मानसिक तणावाला निमंत्रण देणारी असतील. तुमच्या मैत्रीमधील चांगला काळ आठवा आणि त्या आठवणींना उजाळा देऊन नव्याने मैत्रीपूर्ण वाटचाल करा. तुम्ही तुमच्यातील सुप्त गुणांचा वापर कराल. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम सप्ताह असणार आहे. तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल.
लकी क्रमांक :
उतावीळपणा नको
मीन – तुम्ही काही नवीन गोष्ट शिकण्यासाठी योग्य नाहीत. खूप म्हातारे झाला आहात असे काही लोकांना वाटेल. परंतु ते खरे नाही. तुम्ही नवीन गोष्टी सहजपणे आत्मसात करू शकता. कारण तुम्ही चाणाक्ष आहात आणि तुमचे मन कार्यरत असते. तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. तुमच्या ‘चलता है’ भूमिकेमुळे आणि विचित्र वागणुकीमुळे तुमच्यासोबत राहणारी व्यक्ती त्रासून जाईल, अस्वस्थ होईल. आपल्या प्रिय व्यक्तीच्या मूडमधील बदल आज अनेक हेलकावे खाणारा असेल. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. जर तुम्ही शांत राहिला नाहीत तर तुम्ही तुमच्या वैवाहिक आयुष्याला काहीतरी गंभीर हानी पोहोचविण्याची शक्यता आहे.
लकी क्रमांक : ९

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version