Home क्रीडा सातत्य राखण्यास कोलकात्यासह गोवा उत्सुक

सातत्य राखण्यास कोलकात्यासह गोवा उत्सुक

0

इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) साखळीत स्पर्धेत बुधवारी (७ ऑक्टोबर) एफसी गोवा संघ घरच्या मैदानावर गतविजेत्या अ‍ॅट्लेटिको डी कोलकात्याशी दोन हात करतील.

मडगाव (गोवा) – इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) साखळीत स्पर्धेत बुधवारी (७ ऑक्टोबर) एफसी गोवा संघ घरच्या मैदानावर गतविजेत्या अ‍ॅट्लेटिको डी कोलकात्याशी दोन हात करतील.

विजयी सलामीनंतर सातत्य राखण्यास उभय संघ उत्सुक आहेत. मात्र गतविजेत्या कोलकात्याला ‘स्टार’ फुटबॉलपटू हेल्डर पोस्टिगाची अनुपस्थिती जाणवेल. दुखापतीमुळे तीन ते चार आठवडे तो खेळू शकणार नाही.

विजयी सुरुवातीमुळे उभय संघांचा आत्मविश्वास उंचावला आहे. सलामीला कोलकात्याने चेन्नईयिन एफसीवर ३-२ असा विजय मिळवला. गोव्याने दिल्ली डायनामोज्वर २-० अशी मात केली. घरच्या मैदानावर (होम ग्राउंड) सातत्य राखण्यास यजमान उत्सुक असलेली तरी प्रतिस्पर्धी तगडा आहे.

पहिल्या वर्षाच्या तुलनेत यंदा चांगली सुरुवात केल्याने एफसी गोवाचे प्रशिक्षक झिको आनंदी आहेत. ‘‘दुस-या हंगामात आम्ही चांगली सुरुवात केली. मात्र घरच्या मैदानावरील पुढील दोन्ही लढती जिंकण्याला आमचे प्राधान्य राहील. त्याचा फायदा आम्हाला ‘अवे’ खेळताना होईल,’’ असे झिको म्हणाले.

मिडफिल्डर लीओनाडरे डी सिल्वा मॉरा, जोफ्रे मॅटे आणि डेन्सन देवदासवर यजमानांची भिस्त आहे. मात्र रोमिओ फर्नाडेस आणि मंदार राव देसाईकडून त्यांना मोठे योगदान अपेक्षित आहे.

पोस्टिगा खेळणार नसल्याने पाहुण्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्यासह मिडफिल्डर जेवेल राजा, बचावपटू टिरी आणि जोसेमीविना कोलकात्याला गोव्याविरुद्ध खेळावे लागेल. प्रमुख फुटबॉलपटूंच्या अनुपस्थितीतही सवरेत्कृष्ट कामगिरी करू, असा विश्वास अ‍ॅट्लेटिको डी कोलकाताचे प्रशिक्षक अँटोनिओ हबास यांनी व्यक्त केला आहे.

पोस्टिगाची स्नायुदुखी बळावली तीन ते चार आठवडे खेळू शकणार नाही
स्नायूदुखी (हॅमस्ट्रिंग) बळावल्याने गतविजेता कोलकात्याचा प्रमुख फुटबॉलपटू हेल्डर पोस्टिगाची किमान तीन ते चार आठवडे खेळू शकणार नाही. दुखापतींवर उपचारांसाठी मंगळवारी तो मायदेशी (पोर्तुगाल) रवाना झाला. सलामीच्या लढतीदरम्यान शनिवारी पोस्टिगाची स्नायू दुखापत बळावली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुखापत बळावल्याने मायदेशात स्वत:च्या डॉक्टरकडून उपचार करवून घेण्याचा निर्णय त्याने घेतल्याचे कोलकाता संघ व्यवस्थापनाने म्हटले आहे. मात्र दुखापत बळावण्यापूर्वी दोन गोल करताना पोस्टिगाने चेन्नईयिन एफसीविरुद्धच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.  कोलकात्याची ‘होम ग्राउंड’वरील दुसरी लढत २९ ऑक्टोबरला होणार आहे. त्या लढतीत पोस्टिगा खेळेल, अशी आशा कोलकाता संघ व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version