Home महाराष्ट्र सांगलीत सापडलेले ‘घबाड’ कर्नाटकातील नेत्याचे?

सांगलीत सापडलेले ‘घबाड’ कर्नाटकातील नेत्याचे?

0

मिरजेतील बेथेलहेमनगरमधील मोहिद्दीन अबुबकर मुल्ला यांच्याकडून जप्त करण्यात आलेले ३ कोटी ७ लाख ६३ हजार ५०० रुपये कर्नाटकातील एका राजकीय नेत्याचे असल्याचा पोलिसांना संशय आहे.

सांगली – मिरजेतील बेथेलहेमनगरमधील मोहिद्दीन अबुबकर मुल्ला यांच्याकडून जप्त करण्यात आलेले ३ कोटी ७ लाख ६३ हजार ५०० रुपये कर्नाटकातील एका राजकीय नेत्याचे असल्याचा पोलिसांना संशय आहे. मिरजेतून इतकी मोठी रक्कम बेळगाव-चिक्कोडी येथे जाणार असल्याची माहिती मुल्लाला मिळाल्यानंतर त्याने ९ मार्चला शिवाजी स्टेडियम येथे गाडीचा पाठलाग करून ही रक्कम लुटली होती. या रकमेबाबत ‘एलसीबी’च्या पथकाने चिक्कोडी भागात चौकशी केली होती; मात्र तेथे गुन्हा दाखल झाला नव्हता; मात्र मुल्ला हा सराईत चोरटा असल्याचे पुढे आले आहे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत गुन्हेही दाखल आहेत.

मागील काही दिवसांपासून मुल्ला नव्या बुलेटवरून फिरत असल्याने येथील लोकांना त्याच्याबाबत संशय आला होता. त्यातच शनिवारी त्याला सांगलीत संशयास्पद फिरताना ‘एलसीबी’च्या पथकाने हेरले होते. त्याच्या झडतीत सव्वा लाख रुपये मिळाले होते. पुढे कसून चौकशी केल्यानंतर त्याच्या ‘घबाड’ असल्याचे सांगितले. ही रक्कम त्याने बेथेलहेमनगरमधील त्याची मेहुणी रेखा भोरे हिच्या घरात लपवून ठेवली होती. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून ३ कोटी ७ लाख ६३ हजार ५०० रुपये जप्त केले आहेत.

दरम्यान, मुल्लाने लुटलेली रक्कम कर्नाटकातील एका नेत्याची असल्याचे स्पष्ट झाले आहे; परंतु कर्नाटकात कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल नाही. त्यामुळे पोलीस दुजोरा देत नाहीत. पैशाच्या तपासासाठी ‘एलसीबी’चे एक पथक सोमवारी कर्नाटकात रवाना झाले आहे. मुल्लाविरुद्ध बेहिशेबी रक्कम बाळगल्याप्रकरणी मिरजेतील गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. त्याला पाच दिवस कोठडी सुनावण्यात आली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version