Home महाराष्ट्र सहारिया यांनी राज्य निवडणुक आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली

सहारिया यांनी राज्य निवडणुक आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली

0

निवृत्त मुख्य सचिव ज.स.सहारिया यांनी शुक्रवारी राज्य निवडणूक आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली.

मुंबई- निवृत्त मुख्य सचिव ज.स.सहारिया यांनी शुक्रवारी राज्य निवडणूक आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. राज्य मंत्रिमंडळाने आयुक्तपदासाठी सहारिया यांच्या नावाची शिफारस केली होती. मात्र मंत्रिमंडळाची ही शिफारस नवे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी परत पाठवल्यामुळे राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली होती.

१९७८च्या आयएएस बॅचचे अधिकारी असलेल्या सहारिया हे नीला सत्यनारायण यांची जागा घेतील. २००९पासून आयुक्तपदावर कार्यरत असलेल्या सत्यनारायण पाच जुलै रोजी निवृत्त झाल्या होत्या.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version