सवाष्ण-परंपरा

0

आपल्या संस्कृतीत विशेषत: महाराष्ट्रात विविध व्रतवैकल्ये,  कुळधर्म, उद्यापन यांना सवाष्ण पूजन करण्याची पद्धत आहे. त्यामागे काही शास्त्र आहे का? असा प्रश्न विचारला असता, अत्यंत साधा-सोपा त्याचा अर्थ एका महान अभ्यासकाने सांगितला. तो असा.

आपला धर्म माणसात देव आहे असे सांगतो. सवाष्ण पूजन करून आपण अप्रत्यक्ष देवीचे पूजन करीत असतो. ते दान नसून पूजन आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे गरजू स्त्री नाही तर अधिकार संपन्न ज्येष्ठ स्त्री बोलवा. ती तृप्त असावी. कारण तरच ती तुम्हाला मनापासून आशीर्वाद देऊ शकेल. ती निर्व्यग, अपत्य असणारी असावी, तरच ती मनाने शांत असून तुम्हाला शुभेच्छा देऊ शकेल. बरेचदा माहेरवाशीण लेक किंवा नणंद सवाष्ण म्हणून बोलावली जाते. पण एक लक्षात घ्या. त्यांचा साडीचोळीचा अधिकार मुळातच आहेच तुमच्या कुळावर. ते निराळे असावे. शक्यतो सवाष्ण आपल्यापेक्षा वेगळ्या कुलगोत्राची असावी. तिची आपण ओटी भरतो ती सुद्धा प्रतिकात्मक आहे.

तांदूळ.. धनधान्य अभिवृद्धीचे लक्षण आहे. सुपारी.. प्रतिष्ठा आहे. बदाम.. बुद्धी, खारीक.. आरोग्य, नाणे.. संपत्ती, हळकुंड.. वंशवृद्धी, याशिवाय गजरा बांगडय़ा वा इतर सौभग्यलंकार आनंद आणि समाधान प्राप्तीसाठी दिले जातात. त्या सवाष्ण स्त्रीला देवी मानून सारे मनोभावे करायचे वस्तूंपेक्षा भाव महत्त्वाचे. आजकाल स्त्रीमुक्तीवाल्या ओरड करतात. पण याचा अर्थ आहे की, जर स्त्रीमध्ये तुम्ही देवी पाहू शकता तरच तिला बोलवा. सदैव ध्यानात ठेवा.. हे पूजन आहे.. कुणाला आर्थिक मदत.. करत आहात, असे नाही.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version