Home महामुंबई सलमानच्या हिट अँड रन प्रकरणात नवी याचिका

सलमानच्या हिट अँड रन प्रकरणात नवी याचिका

0

बहुचर्चित सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणातील मुख्य साक्षीदार रविंद्र पाटीलच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी करणारी नवी याचिका गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली.

मुंबई – बहुचर्चित सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणातील मुख्य साक्षीदार रविंद्र पाटीलच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी करणारी नवी याचिका गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली.

पुणे स्थित कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली. पाटील यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. क्षयरोगाने ग्रस्त असलेले पाटील मुंबईच्या रस्त्यावर सापडले होते. शिवडीच्या महापालिका रुग्णालयात चार ऑक्टोंबर २००७ रोजी पाटीलचा मृत्यू झाला होता.

पोलिस दलात असणारे रविंद्र पाटील सलमान खानने आपल्या गाडीखाली पाच जणांना चिरडले त्यावेळी अंगरक्षक म्हणून त्याच्यासोबत होते. रविंद्र पाटील यांनी सलमान विरोधात साक्ष दिली होती. पाटील यांनी आपली साक्ष फिरवावी यासाठी त्यांच्यावर दबाव होता. ते काही वर्ष गायबही होते असा मुद्दा याचिकाकर्त्यांनी मांडला आहे.

या प्रकरणात सलमानला सत्र न्यायालयाने सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवत पाचवर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. मुंबई उच्च न्यायालयाने सलमानच्या शिक्षेला स्थगिती देत त्याला जामिन मंजूर केला. या प्रकरणी लवकर उच्च न्यायालयात सुनावणी सुरु होणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version