Home क्रीडा सराव सामन्यात वरुण अॅरॉनचा भेदक मारा

सराव सामन्यात वरुण अॅरॉनचा भेदक मारा

0

ऑस्ट्रेलियाच्या तेज उसळी घेणा-या खेळपट्ट्यांचा भारताचे वेगवान गोलंदाज अचूक फायदा उचलत आहेत.

अॅडलेड – ऑस्ट्रेलियाच्या तेज उसळी घेणा-या खेळपट्ट्यांचा भारताचे वेगवान गोलंदाज अचूक फायदा उचलत आहेत. गुरुवारपासून सुरु झालेल्या क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) इलेव्हन विरुध्दच्या दोन दिवसीय सराव सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी प्रभावी मारा केला.

भारताच्या भेदक मा-यासमोर क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हनचा डाव २४३ धावात संपुष्टात आला. भारताकडून वरुण अॅरॉन सर्वाधिक प्रभावी ठरला. त्याने चौदा षटकात ४१ धावा देत चार फलंदाजांना तंबुचा रस्ता दाखवला. करण शर्माने तीन गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली. मोहोम्मद शामीने दोन तर, रविंद्र जाडेना एक गडी बाद केला.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून जेसी सिल्क (५८) आणि गॉचच (५८) अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी निराशा केली. दोघांनी प्रत्येकी ५८ धावा केल्या. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची सुरुवातही निराशाजनक झाली.

सलामीवीर शिखर धवन शून्यावर बाद झाला. चेतेश्वर पूजारा (२२) धावांवर बाद झाला. कर्णधार विराट कोहली आणि मुरली विजयची जोडी मैदानावर असून, विजय (३९) आणि कोहली (३०) धावांवर खेळत आहे. दिवसअखेर भारताच्या दोन बाद ९९ धावा झाल्या आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version