Home महामुंबई सरपंचपदाच्या निवडणुका २७ नोव्हेंबरला

सरपंचपदाच्या निवडणुका २७ नोव्हेंबरला

0

तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २१ ऑक्टोबर रोजी झाल्या होत्या. तेथील विद्यमान सदस्य मंडळांची मुदत संपत आली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व सात ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडणुका २७ नोव्हेंबर रोजी घेतल्या जाणार आहेत.

नेरळ – तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २१ ऑक्टोबर रोजी झाल्या होत्या. तेथील विद्यमान सदस्य मंडळांची मुदत संपत आली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व सात ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडणुका २७ नोव्हेंबर रोजी घेतल्या जाणार आहेत.

वावळोली, कळंब, उकरूळ, मांडवणे आणि दहिवली, तर्फे, वरेडी या सात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. तेथील सरपंच, उपसरपंचपदांसाठी २७ नोव्हेंबर २०१२ रोजी निवडणुका होणार असल्याची माहिती कर्जत तहसील कार्यालयाने दिली आहे. त्यात वावळोली ग्रूप ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जमाती महिला राखीव, असे आरक्षण सरपंचपदासाठी आहे. वेणगाव ग्रूप ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जमाती महिला राखीव आरक्षण सरपंचपदासाठी आहे. कोंदिवडे ग्रूप ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जमाती सर्वसाधारण आरक्षण सरपंचपदासाठी आहे. मांडवणे ग्रामपंचायतीमध्ये मागासवर्ग महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. दहिवली, तर्फे, वरेडी ग्रूप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी अनुसूचित जमाती सर्वसाधारण, असे आरक्षण आहे. उकरूळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी अनुसूचित जमाती सर्वसाधारण असे आरक्षण असून, कळंब या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपद सर्वसाधारण आहे.

रोह्यात पाच ग्रामपंचायतींच्या ३७ जागांसाठी ६३ उमेदवार

अलिबाग – रोहा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका २६ नोव्हेंबर रोजी होत आहेत. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतअखेर ३७ जागांसाठी ६३ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीबरोबरच तालुक्यातील वाशी, तळाघर, तांबडी, भालगाव व वांगणी ग्रामपंचायतीच्या पाच जागांसाठी पोटनिवडणुका होत असून, या ठिकाणी तीन जागा बिनविरोध निवडण्यात आल्या आहेत, तर दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत.

रोहा तालुक्यातील पुई ग्रामपंचायतीच्या एकूण सात जागांसाठी २६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी पुईमध्ये एक जागा बिनविरोध निवडण्यात आली असून, १३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. उर्वरित सहा जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. पहुर ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी १५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर तळवळीतर्फे अष्टमीच्या सात जागांमधील तीन जागा बिनविरोध निवडण्यात आल्या असून, चार जागांसाठी आठ उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवले आहेत. दापोली ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. यातील एक जागा बिनविरोध निवडण्यात आली असून, उर्वरित सहा जागांसाठी ११ उमेदवारांचे अर्ज शिल्लक आहेत. खरखुद ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी १७ उमेदवार असून, येथील एक जागा बिनविरोध निवडण्यात आली आहे. पोटनिवडणूक होत असलेल्या वाशी, तळाघर, तांबडी, भालगाव व वांगणी ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक होणार होती. यातील दोन जागा मतदारांनी सहमतीने बिनविरोध निवडून दिल्या आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version