Home टॉप स्टोरी सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्के वाढ

सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्के वाढ

0

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यामध्ये सहा टक्क्यांची वाढ केल्याने एक कोटी कर्मचा-यांना लाभ मिळणार आहे.

नवी दिल्ली- केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यामध्ये सहा टक्क्यांची वाढ केली आहे. या निर्णयामुळे केंद्राच्या एक कोटी कर्मचारी व निवृत्तीधारकांना लाभ मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सध्या सरकारी कर्मचा-यांना ११३ टक्के महागाई भत्ता मिळत होता, मात्र आता त्यात ६ टक्के वाढ करण्यात आल्याने तो आता ११९ टक्के होणार आहे. ही वाढ एक जुलै २०१५ पासून लागू होणार आहे. यामुळे केंद्र सरकारमधील ४८ लाख कर्मचा-यांना आणि ५५ लाख निवृत्तीधारकांना लाभ होणार आहे.

महागाईमध्ये वाढ झाल्यामुळे भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे. यासाठी सात हजार ६९१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. निवृत्तीधारकांना देण्यात येणा-या भत्त्यासाठी पाच हजार १२७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

यापूर्वी केंद्र सरकारने एप्रिल महिन्यात महागाई भत्त्यात वाढ केली होती. ही वाढ एक जानेवारी २०१५ पासून लागू करण्यात आली होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version