Home देश सभागृहातील गोंधळ क्लेशदायक- पंतप्रधान

सभागृहातील गोंधळ क्लेशदायक- पंतप्रधान

0

लोकसभेत रेल्वेचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना झालेला गदारोळ क्लेशदायक असून लोकशाहीसाठी दु:खद असल्याची खंत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली.
नवी दिल्ली- लोकसभेत रेल्वेचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना झालेला गदारोळ क्लेशदायक असून लोकशाहीसाठी दु:खद असल्याची खंत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली. लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर खासदारांच्या गटाशी त्यांनी बोलताना सांगितले.

सभागृहात जे झाले ते मन पिळवटून टाकणारे होते. शांततेचे सतत आवाहन करूनही अशा घटना होतात, हे लोकशाहीसाठी अत्यंत खेदजनक बाब आहे, असे ते म्हणाले. तेलंगण मुद्दयावर खासदारांनी मोठा गोंधळ केल्यामुळे रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांना अर्धवटच अर्थसंकल्प वाचता आला. संसदीय कार्यमंत्री कमल नाथ यांनीही या गोंधळाचा निषेध केला.

[EPSB]

अंतरिम रेल्वे अर्थसंकल्पात प्रवासी भाड्यात वाढ नाही »

केंद्रीय रेल्वे मंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी २०१४-१५साठीचा अंतरिम रेल्वे अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version