Home देश ‘सनातन’वर देशव्यापी बंदीची मागणी

‘सनातन’वर देशव्यापी बंदीची मागणी

0

सनातन संस्था ही दहशतवादी संघटना असल्याचे जाहीर करून त्यावर देशव्यापी कायम बंदी घालावी, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेसने केल्याचे प्रदेश सरचिटणीस सुनील कवठणकर यांनी सांगितले.

पणजी- सनातन संस्था ही दहशतवादी संघटना असल्याचे जाहीर करून त्यावर देशव्यापी कायम बंदी घालावी, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेसने केल्याचे प्रदेश सरचिटणीस सुनील कवठणकर यांनी सांगितले. या मागणीसाठी प्रदेश काँग्रेसतर्फे पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्रे पाठवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पणजीतील काँग्रेस भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले की, सनातनच्या हिंसक कारवायांची केंद्र आणि राज्य सरकारने गंभीरपणे दखल घेण्याची गरज आहे. दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनलेले गोव्यातील फोंडा महालातील रामनाथी येथील सनातनचे मुख्यालय ताबडतोब बंद करून संस्थेची मालमत्ता, बँकेची खाती गोठवावी आणि राष्ट्रहिताचा विचार करून संस्थेला मिळत असलेल्या निधीचा स्रेत शोधून काढावा, अशी विनंतीही केली आहे.

‘सनातन’मुळे गोव्याचे नाव बदनाम झालेले असताना काही व्यक्तींमुळे सनातन संस्थेला दोषी ठरवता येत नाही हे गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पास्रेकर यांनी केलेले विधान संशयास्पद असल्याचा आरोपही कवठणकर यांनी केला. पोलीस अधिकारी आणि पत्रकारांनाही धमक्या देण्याचे प्रकार सुरू आहेत, या पार्श्वभूमीवर ‘सनातन’वर देशव्यापी बंदी घालणेच योग्य ठरेल, असा दावा पत्रातून केल्याचे कवठणकर यांनी सांगितले.

दरम्यान, ‘सनातन’ ही एक संघटना आहे आणि प्रतिनिधीने जर काही गरकृत्य केले असेल वा केल्याचा संशय असेल तर त्यासाठी संपूर्ण संघटनेला दोषी ठरवता येणार नाही, असे मत गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पास्रेकर यांनी व्यक्त केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version