Home क्रीडा सचिन २१ व्या शतकातला सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू

सचिन २१ व्या शतकातला सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू

0

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संकेतस्थळाने घेतलेल्या ऑनलाईन मतदानात भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सर्वाधिक मते मिळवून २१ व्या शतकातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू ठरला आहे.
सिडनी – क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संकेतस्थळाने घेतलेल्या ऑनलाईन मतदानात भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सर्वाधिक मते मिळवून २१ व्या शतकातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू ठरला आहे.

२००० सालानंतरचा सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू ठरवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी संबंधित संकेतस्थळाने ऑनलाईन मतदान घेतले होते. १०० क्रिकेटपटूंमधून सचिन अव्वल ठरला आहे.

श्रीलंकेच्या कुमार संगकाराला दुस-या क्रमांकाची सर्वाधिक मते मिळाली. त्याखालोखाल ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट तिस-या स्थानावर आहे. १६ हजार पेक्षा जास्त क्रिकेट चाहत्यांनी या मतदानात भाग घेतला होता.

सचिनला २३ टक्के, संगकाराला १४ टक्के मते मिळाली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या संकेतस्थळावर २००० नंतरच्या शंभर सर्वोत्तम क्रिकेटपटूंची यादी प्रसिध्द केली आहे. वेस्ट इंडिज विरुध्द २०० वा कसोटी सामना खेळल्यानंतर २०१३ मध्ये सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

पहिल्या दहामधून भारतातून एकटया सचिन तेंडुलकरला स्थान मिळाले आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचे चार, दक्षिण आफ्रिकेचे तीन आणि श्रीलंकेच्या दोन क्रिकेटपटूंचा समावेश आहे. ४२ वर्षीय तेंडुलकर क्रिकेट जगतातील असा एकमेव फलंदाज आहे ज्याच्या नावावर १०० शतकांचा विक्रम आहे. एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम सचिनच्या नावावर आहे.

ऑनलाईन निकाल –
(१) सचिन तेंडुलकर (भारत) २३% ,
(२) कुमार संगकारा (श्रीलंका) १४%
(३) अॅडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया) १३%
(४) रिकी पॉटिंग (ऑस्ट्रेलिया) ११ %
(५) जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) ११%
(६) एबी डी विलियर्स (दक्षिण आफ्रिका) १०%
(७) शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) ९%
(८) ग्लेन मॅग्राथ (ऑस्ट्रेलिया) ५%
(९) मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) ३%
(१०) डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका) १%

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version