Home देश सईद यांच्या विधानावरुन दुस-या दिवशीही गोंधळ

सईद यांच्या विधानावरुन दुस-या दिवशीही गोंधळ

0

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहोम्मद सईद यांच्या वादग्रस्त विधानावरुन सलग दुस-या दिवशी लोकसभेमध्ये जोरदार गदारोळ झाला.

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहोम्मद सईद यांच्या वादग्रस्त विधानावरुन सलग दुस-या दिवशी लोकसभेमध्ये जोरदार गदारोळ झाला.

सईद यांच्या मताशी आपण सहमत नसल्याचे सरकारने सोमवारीच स्पष्ट केले. मात्र सरकारच्या या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर स्पष्टीकरण द्यावे या मागणीवर विरोधक ठाम आहेत.

त्यामुळे सलग दुस-या दिवशी या विधानावरुन सभागृहात जोरदार गदारोळ झाल्याने लोकसभेचे कामकाज काहीवेळासाठी तहकूब करावे लागले. रविवारी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सईद यांनी लगेचच काश्मीरमध्ये निवडणुका होऊ दिल्याबद्दल मी पाकिस्तान, दहशतवादी आणि फुटीरतवाद्याचे आभार मानतो असे वादग्रस्त वक्तव्य केले.

इतके होऊनही सईद आपल्या या राष्ट्रविरोधी वक्तव्यावर ठाम आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी यावर स्पष्टीकरण द्यावे अशी विरोधकांची मागणी आहे. कारण जम्मू-काश्मीरमधल्या सरकारमध्ये भाजपाही सहभागी आहे. विरोधीपक्षाच्या खासदारांनी प्रश्नोत्तराच्या तासाला गोंधळ घालण्यास सुरुवात केली त्यामुळे सभापती सुमित्रा महाजन यांनी दोनवेळा अल्पकाळासाठी लोकसभा तहकूब केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version