Home महाराष्ट्र संजय दत्तला एक महिन्याचा पॅरोल

संजय दत्तला एक महिन्याचा पॅरोल

0

मुंबईत १९९३साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात येरवडा तुरुंगात पाच वर्षाची शिक्षा भोगणा-या अभिनेता संजय दत्तला एक महिन्याचा पॅरोल मंजूर झाला आहे. 

पुणे- मुंबईत १९९३साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात येरवडा तुरुंगात पाच वर्षाची शिक्षा भोगणा-या अभिनेता संजय दत्तला एक महिन्याचा पॅरोल मंजूर झाला आहे. पुण्यातील विभागीय आयुक्तांनी संजय दत्तच्या पॅरोलचे आदेश काढले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय शनिवारी तुरुंगातून बाहेर येणार आहे.

विशेष म्हणजे याआधीही संजय दत्तला १४ दिवसांचा पॅरोल मंजूर झाला होता. याआधी संजयला वैद्यकीय कारणांसाठी ऑक्टोबर महिन्यात पॅरोल मंजूर करण्यात आला होता.

संजय दत्त सध्या पुण्यातील येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. मुंबईत १९९३साळी झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याबद्दल त्याला पाच वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली होती.

सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर मे महिन्यात संजय दत्त विशेष टाडा न्यायालयात शरण आला होता. त्यानंतर त्याला पुण्यातील येरवडा तुरुंगात ठेवण्यात आले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version