Home देश संकेतस्थळावरील मंत्र्यांची नावे काढण्याचे आदेश

संकेतस्थळावरील मंत्र्यांची नावे काढण्याचे आदेश

0

सरकारी संकेतस्थळावरील मंत्री, राजकीय नेते आणि अन्य पक्षांचे तपशील काढून टाकण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. 
चंदीगड- सरकारी संकेतस्थळावरील मंत्री, राजकीय नेते आणि अन्य पक्षांचे तपशील काढून टाकण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. लोकसभा निवडणुका पार पडेपर्यंत ही नावे काढून टाकण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.

पंजाब राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.के.सिंग यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या वेबसाइटवरील सर्व मंत्र्यांचे, राजकीय नेत्यांचे आणि पक्षाचे संदर्भ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्र अथवा राज्य सरकारच्या विविध खात्यांनी केलेल्या कमगिरीची माहिती वेबसाइटवर ठेवण्यास हरकत नाही. मात्र यात मंत्री अथवा राजकीय नेत्यांचे प्रशंसा करणारे संदर्भ काढून टाकावेत असे सिंग यांनी म्हटले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version