Home देश श्रीनगरमधील लाल चौकात ग्रेनेड स्फोट

श्रीनगरमधील लाल चौकात ग्रेनेड स्फोट

0
grenade explosion

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर शहरात शनिवारी झालेल्या ग्रेनेड स्फोटात सात जण जखमी झाले आहेत.
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर शहरात शनिवारी झालेल्या ग्रेनेड स्फोटात सात जण जखमी झाले आहेत. हा स्फोट दहशतवाद्यांनी घडवून आणल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहरातील लाल चौक या गर्दीच्या ठिकाणी दुपारी हा स्फोट झाला. काही दहशवाद्यांनी सुरक्षा दलाच्या दिशेने ग्रेनेड फेकले, मात्र ते सुरक्षा जवानांपर्यंत न पोहचता रस्त्याच्या बाजूला पडले आणि त्यांचा स्फोट झाला.   

स्फोटातील जखमींना एसएमएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये एक महिला, दोन मुले आणि सुरक्षा जवानांचा समावेश आहे.या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version