Home महाराष्ट्र श्रीगोंदा बस आगाराला घाणीचा विळखा

श्रीगोंदा बस आगाराला घाणीचा विळखा

0

श्रीगोंदा बसस्थानकाची प्रचंड दुरवस्था झाली असून, तेथील समस्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याने प्रवाशांसह खुद्द राज्यमार्ग परिवहन विभागाचे अधिकारीही त्रस्त आहेत.
श्रीगोंदा –  श्रीगोंदा बसस्थानकाची प्रचंड दुरवस्था झाली असून, तेथील समस्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याने प्रवाशांसह खुद्द राज्यमार्ग परिवहन विभागाचे अधिकारीही त्रस्त आहेत. बस आगारात बस कमी आणि समस्याच जास्त, अशी स्थिती आहे. श्रीगोंदा शहराची इतिहासात एक वेगळीच ओळख आहे त्याच श्रीगोंदा बसस्थानकाची ही दुरवस्था संपणार कधी, असा स्थानिक रहिवाशांचा प्रश्न आहे.

श्रीगोंदा शहराच्या बसस्थानकावर पिण्याचे पाणी, शौचालय व प्रसाधनगृहाची सोय असूनही नागरिकांकडून उघडय़ावर घाण केली जाते. बसस्थानकाची इमारत व त्यामागील बस थांबण्यासाठी असलेली जागा प्रशस्त असली तरी अस्वच्छतेने या बसस्थानकाला विळखा घातला आहे. आगारात स्वच्छता असावी आणि प्रवाशांना आकर्षति करण्यासाठी दर शुक्रवारी स्वच्छता दिवस पाळला जातो. पण याबाबत श्रीगोंदा आगाराला माहिती आहे नाही हा एक प्रश्न आहे

पिचका-यांची रंगपंचमी

बसस्थानकावर बसण्यासाठी धड जागा नाही. बसस्थानकात गुटखा, पान खाऊन इतक्या पिचका-या मारल्या आहेत, की जणू रंगपंचमी साजरी झाली, अशी परिस्थिती आहे. प्रवाशांना बसायला स्थानकात व्यवस्था नाही. जे बाकडे आहेत त्यावर घाण असते. दोन-चार वर्षात कधी साफसफाई केली नाही, त्यामुळे धूळ व घाण साचली आहे. राज्यमार्ग परिवहन विभागाच्या बसही बसस्थानकावर उभ्या न राहता स्थानकापासून काही अंतरावर स्वच्छ जागेत थांबतात. अशा घाणीत श्रीगोदेंकरांना बसस्थानकात तासन्तास प्रवाशांना उभे राहावे लागते.

स्वच्छतेच्या सूचना देण्याकडेही आगार व्यवस्थापकांचे दुर्लक्ष

सफाई कामगारांना स्वच्छतेच्या सूचना देण्याचे काम आगार व्यवस्थापकांचे असते, असे एसटीच्या एका कर्मचा-याने सांगितले. नाशिकमध्ये एसटीचे दोन आगार आहेत. त्यातील व्यवस्थापकानेच सफाई कर्मचा-यांना वेळोवेळी स्वच्छतेच्या सूचना देणे अपेक्षित असताना, त्यांच्याकडूनच कर्मचा-यांना पाठीशी घातले जात असल्याचे कच-याच्या सद्यस्थितीवरून स्पष्ट होते.

अवैध प्रवासी वाहतूक जोमात

सध्या प्रवाशांची गर्दी खूप आहे. परंतु श्रीगोंदा आगारात येणा-या बस प्लॅटफॉर्मवर न लावता इकडे तिकडे लावल्यामुळे या प्रवाशांची धावपळ होते. त्यात भर म्हणजे श्रीगोंदा बसस्थानकातच अवैध वाहतुकीच्या बस थेट बसस्थानकातील प्रवासी घेऊन जातात. तसेच जीप, रिक्षा आदी गाडय़ा बसस्थानकातच उभ्या करतात याकडे बसस्थानक व्यवस्थापनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे अवैध वाहतूकदारांचे फोफावत आहे.

बसस्थानकावर चो-यांचे वाढते प्रमाण

श्रीगोंदा बसस्थानकात पोलीस असणे आवश्यक आहे. परंतु पोलीस नसल्यामुळे प्रवाशांचे पर्स चोरी होणे, मंगळसूत्र चोरी, विद्यार्थिंनींची छेडाछेड असे प्रकार वारंवार घडत आहेत. तेथे पोलीस कक्ष आहे, परंतु पोलीस नाहीत अशा अनेक समस्या भेडसावत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version