Home महामुंबई ठाणे ‘श्रमजीवी’चे वेठबिगार मुक्तीसाठी आंदोलन

‘श्रमजीवी’चे वेठबिगार मुक्तीसाठी आंदोलन

0

खर्डीतील ललित कंपनीत वेठबिगारी करणा-या ११ मजुरांच्या मुक्तीसाठी श्रमजीवी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तब्बल सात तास ठिय्या आंदोलन पुकारले. 

शहापूर – खर्डीतील ललित कंपनीत वेठबिगारी करणा-या ११ मजुरांच्या मुक्तीसाठी श्रमजीवी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तब्बल सात तास ठिय्या आंदोलन पुकारले. श्रमजीवीचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी शहापूर तहसील कार्यालयात पोलिस बंदोबस्तात आंदोलन करून बेठबिगार राजू हुलगुंडे व इतर वेठबिगारांच्या जाहीर बंध मुक्तीचा आग्रह धरला. अखेर रात्री आठ वाजता त्या ११ वेठबिगार कामगारांना मुक्त करण्यात आले.

खर्डीजवळील ललित कंपनीचे मालक सलिम शेठ, व्यवस्थापक कोलते, मॅथ्यू, अनिरुद्ध सिंग सोमा आवटे यांनी गेल्या नऊ महिन्यांपासून वेठबिगारांना कोंडून १० ते १२ तास राबवून घेतले होते. दगड फोडीसाठी ते शिविगाळ करत. राजूचा भाऊ विठ्ठललाही मारहाण झाल्याने तो आजारी पडला. मजुरीचे पैसे वारंवार मागूनही ते दिले नाहीत. मजुरीचे पैसे वारंवार मागण्याच्या तगाद्याने राजू व त्याची पत्नी रुक्मिणीला नवी मुंबई येथील बेलापूर येथे बोलवून मारहाण केली. नऊ महिन्यांची मजुरी न मिळाल्याने राजू हुलगुंडेची मुलगी राधा हिचा विवाहही मोडला. या प्रकरणी शुक्रवारी श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर, स्नेहा दुबे-पंडित, प्रकाश खोडका, जिल्हा परिषद सदस्या संगीता भोये यांनी शहापूर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. श्रमजीवी संघटनेच्या आक्रमक पावित्र्यानंतर शहापूर तहसीलदार सुनिल भुताळे यांनी राजू हुलगुंडे व इतर वेठबिगारांना मुक्त केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version