Home टॉप स्टोरी राहुल गांधी यांचा मोदींना जोरदार टोला

राहुल गांधी यांचा मोदींना जोरदार टोला

0

शेतक-यांच्या प्रश्नावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर बुधवारी पुन्हा तोफ डागली.


नवी दिल्ली- शेतक-यांच्या प्रश्नावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर बुधवारी पुन्हा तोफ डागली. सतत परदेश दौ-यावर असणा-या पंतप्रधान मोदी यांना वेळ असल्यास त्यांनी देशातील शेतक-यांच्या बिकट अवस्थेकडेही लक्ष द्यावे, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.

राहुल गांधी यांनी मंगळवारी पंजाबमध्ये जाऊन तेथील शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्या. तेथील शेतक-यांची भीषण परिस्थिती त्यांनी लोकसभेच्या शून्य तासात मांडली.

पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडताना ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे सातत्याने परदेश दौ-यावर असतात. ते सध्या भारतात आहेत. त्यामुळे त्यांना वेळ असल्यास त्यांनी शेतक-यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. शेतकरी संपूर्ण देशाला अन्नधान्य पुरवतात. त्यांचे हे योगदान ‘मेक इन इंडिया’ नव्हे काय? असा प्रश्न त्यांनी मोदींना केला.

गेल्या चार महिन्यांपासून विविध राज्यांमध्ये अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे. मात्र केंद्राने त्यांना कोणतीही मदत केली नाही. शेतक-यांनी खतांची मागणी केल्यावर त्यांच्यावर लाठया चालवण्यात आल्या. आता त्यांनी पिकवलेल्या धान्याला उचल नाही. त्यामुळे शेतक-यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे, असे गांधी यांनी सांगितले. हरियाणातील शेतक-यांनी आपल्या बिकट परिस्थितीमुळे आत्महत्या केल्या.  

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version