Home देश शाहरुखचे सासरे कर्नल छिब्बर यांचे निधन

शाहरुखचे सासरे कर्नल छिब्बर यांचे निधन

0

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचे सासरे कर्नल रमेशचंद्र छिब्बर यांचे मंगळवारी रात्री दिल्लीमध्ये निधन झाले.

नवी दिल्ली- बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचे सासरे आणि गौरी खानचे वडील कर्नल रमेशचंद्र छिब्बर यांचे मंगळवारी रात्री दिल्लीमध्ये निधन झाले.

छिब्बर यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी लोधी रोड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी शाहरूख खान, गौरी खान आणि तिचा भाऊ विक्रांत यांच्यासह नातेवाईक उपस्थित होते. बॉलीवूडमधील अभिनेता आणि दिग्दर्शक करण जोहरही उपस्थित होता.

कर्नल छिब्बर यांना मंगळवारी रात्री त्रास होऊ लागल्याने दिल्लीतील एस्कॉर्ट रूग्णालयात उपचारासाठी दाखल आले. मात्र उपचारादरम्यान रात्री नऊ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ही दुःखद बातमी समजताच शाहरूख खान मंगळवारी रात्रीच पत्नीसहीत  तातडीने दिल्लीला रवाना झाला.

कर्नल रमेशचंद्र छिब्बर हे होशियारपूर जिल्हयातील पट्‌टी गावातून १९७० मध्ये दिल्लीत स्थायिक झाले होते. त्यांच्या मागे पत्नी सविता छिब्बर, मुलगी गौरी खान आणि मुलगा विक्रांत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version