Home क्रीडा व्हीटीसी मैदान फक्त खेळण्यासाठीच!

व्हीटीसी मैदान फक्त खेळण्यासाठीच!

0

उल्हासनगर महापालिकेच्या मालमत्ता विभागाने व्हीटीसी मैदान सुधांशू महाराजांच्या प्रवचनासाठी दिले होते.

उल्हासनगर- उल्हासनगर महापालिकेच्या मालमत्ता विभागाने व्हीटीसी मैदान सुधांशू महाराजांच्या प्रवचनासाठी दिले होते. अल्पदरात दिलेल्या या मैदानाचा ताबा आयोजकांनी काही दिवस आधीच घेऊन खेळाडूंना खेळण्यास मज्जाव केला होता.

याबाबत ‘प्रहार’ने गुरुवारी वृत्त प्रकाशित केल्यानंतर ‘स्वाभिमान’ संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांनी व्हीटीसी मैदान फक्त क्रीडा कार्यक्रमांसाठी आरक्षित करण्याचे आदेश उपायुक्त नितीन कापडणीस यांना दिले.

उल्हासनगर महापालिकेच्या मालमत्ता विभागाने व्हीटीसी मैदान सुधांशू महाराज यांच्या कार्यक्रमासाठी दिले आहे. त्यांना प्रत्यक्षात  २८ तारखेपासून मैदानाचा ताबा घ्यायचा असताना २२ तारखेपासूनच मंडप घालणा-यांनी काम सुरू केले होते. यामुळे ऐन दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांच्या खेळावर बंदी आली आहे.

याबाबत ‘प्रहार’ने गुरुवारी सविस्तर वृत्त प्रकाशित करत प्रशासनाचा हा भोंगळ कारभार चव्हाटय़ावर आणला होता. त्यानंतर ‘स्वाभिमान’ संघटनेचे जिल्हा संघटक रोहित साळवे, शहर संघटक विशाल सोनावणे, संपर्कप्रमुख प्रशांत चंदनशिवे, शेखर ठोसर, मंगेश हिवराळे आदींनी पालिका आयुक्त मनोहर हिरे यांची गुरुवारी सायंकाळी भेट घेतली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने मैदानाचा वापर फक्त खेळ आणि खेळांच्या स्पर्धापुरताच मर्यादित ठेवण्याबाबत दिलेल्या आदेशाची प्रत पालिका आयुक्त हिरे यांना देण्यात आली.

यानंतर आयुक्तांनी उपायुक्त नितीन कापडणीस यांना व्हीटीसी मैदान फक्त खेळण्यासाठी आरक्षित करण्याचा ठराव तात्काळ महासभेसमोर ठेवण्याचे आदेश दिले. यामुळे उल्हासनगरमधील खेळाडूंनी ‘प्रहार’ व ‘स्वाभिमान’ संघटनेचे आभार मानले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version