Home टॉप स्टोरी व्यापम घोटाळा, काँग्रेसकडून स्थगन प्रस्ताव सादर होण्याची शक्यता

व्यापम घोटाळा, काँग्रेसकडून स्थगन प्रस्ताव सादर होण्याची शक्यता

0

देशभरात गाजत असलेल्या व्यापम घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस बुधवारी स्थगन प्रस्ताव सादर करण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली – देशभरात गाजत असलेल्या व्यापम घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस बुधवारी लोकसभेत स्थगन प्रस्ताव सादर करण्याची शक्यता आहे.

आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी निधन झालेल्या माजी खासदारांना आंदरांजली वाहून लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या खासदारांसह बैठक घेतली. या बैठकीत व्यापम मुद्दयाबाबत निर्णय घेण्यात आला.

तसेच या घोटाळ्यात सहभागी असलेल्यांविरोधात कारवाईच्या मागणीसाठी काँग्रेस खासदार संसदेत धरणे आंदोलन करणार आहेत. सोनिया गांधी आणि राहुल गांधीही या आंदोलनात सहभागी राहतील अशी माहिती सूत्रांनी दिली.

व्यापम घोटाळ्याप्रकऱणी विरोधकांकडून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून केली जात आहे. चौहान यांच्या राजीनाम्याशिवाय घोटाळाप्रकरणाचा प्रामाणिक आणि निपक्ष:पातीपणे तपास शक्य नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

या अधिवेशनात काँग्रेस व्यापमसह आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदीवाद प्रकरणाचा मुद्दाही लोकसभेत उपस्थित करणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version