Home व्यक्तिविशेष वीराचार्य बाबासाहेब श्रीपल कनचुरे

वीराचार्य बाबासाहेब श्रीपल कनचुरे

0

वीराचार्य बाबासाहेब श्रीपल कनचुरे यांचा आज स्मृतिदिन.
दि. १८ ऑक्टोबर १९५४ रोजी दरूर, ता.अ थणी, जि. बेळगाव येथे जन्मलेले कनचुरे यांची कर्मभूमी मात्र महाराष्ट्रात होती. व्यवसायाने वकील असणारे बाबासाहेब वक्तृत्व, नाटय़, कुस्ती, मल्लखांब यांत प्रवीण होते. वृक्षारोपण आणि संवर्धन, स्त्री-शिक्षणाचा पुरस्कार, व्यसनमुक्तीसाठी आंदोलन आणि वीरसेवादलाचा कार्यविस्तार यांसाठी अवघे जीवन समर्पित करणाऱ्या बाबासाहेबांना मुनिश्री आर्यनंदी महाराज यांच्या उपस्थितीत कुंथलगिरी येथे ‘वीराचार्य’ ही पदवी दिली गेली. ‘वीर शिरोमणी’, ‘ वीणा भूषण’ या त्यांना मिळालेल्या अन्य पदव्या. देशातील पहिल्या व्यसनमुक्ती दिंडीचे जनक असणाऱ्या वीराचार्यानी निव्यर्सनी तरुण पिढीच्या नेतृत्व उभारणीसाठी प्रशिक्षण वर्ग, पाठशाळा चालविल्या. त्याग, सेवा, बंधुभाव, राष्ट्रीय एकात्मता आणि व्यसनमुक्तीसाठी अविरत झटणारे हे बाबासाहेब! सामाजिक, धार्मिक, राष्ट्रीय आणि शैक्षणिक क्षेत्रात आपली कतृत्वपताका फडकविणारे बाबासाहेब! तरुण पिढीवर सुसंस्काराचे बीजारोपण करून त्यांना व्यसनांपासून मुक्ती देणारा एकसंध समाजनिर्मितीसाठी प्रयत्नशील असलेला आणि युवा पिढीला श्रमाचे मूल्य पटवून देणारा हा कृतिशील कार्यकर्ता दि. १६ ऑगस्ट १९८८ रोजी आपल्यातून निघून गेला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version