Home व्यक्तिविशेष विष्णू नारायण भातखंडे

विष्णू नारायण भातखंडे

0

दि. १० ऑगस्ट १८६० या दिवशी मुंबईतील वाळकेश्वर येथे हिंदुस्थानी संगीत क्षेत्रातील एका थोर संगीतशास्त्रकारांचा जन्म झाला. त्यांचे नाव विष्णू नारायण भातखंडे! कोकणातील नागाव गावचे हे विष्णू नारायण ऊर्फ संगीतशास्त्र संशोधक, संगीत प्रसारक म्हणून ओळखले जातात. बालपणापासून संगीताची उपजत जाण असणा-या विष्णू नारायणांनी उपलब्ध रागदारी व चिजा हाच संशोधनाचा व उपपत्तीचा पाया मानून संगीत कलेच्या आपल्या अभ्यासाची सुरुवात केली. त्यासाठी अनेक बुजुर्ग कलावंतांची मते जाणून घेण्यासाठी भारतभर प्रवास केला. प्राचीन संगीत विद्येचे संशोधन, नव्या संगीत शास्त्रची उभारणी आणि त्याचा प्रचार व प्रसार यासाठी त्यांनी संगीत विद्यालयांची स्थापना केली. बडोद्याची संगीतशाळा, ग्वाल्हेरचे माधव संगीत विद्यालय ही त्यांची कर्तृत्वस्थळे. लखनौ येथे मॉरिस कॉलेज ऑफ हिंदुस्थानी म्युझिक स्थापन केले. हेच आजचे भातखंडे संगीत महाविद्यालय! अशा या महान संगीतशास्त्राची, हिंदुस्थानातील थोर संगीत प्रसारकाची अखेर दि. १९ सप्टेंबर १९३६ रोजी मुंबईतील वाळके श्वर येथेच झाली. आज त्यांचा जन्मदिन.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version