Home क्रीडा विश्वनाथन आनंदने कॅरुआनाला रोखले

विश्वनाथन आनंदने कॅरुआनाला रोखले

0

भारताच्या विश्वनाथन आनंदने ग्रेन्के बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेत पहिल्या फेरीमध्ये सोमवारी इटलीच्या फॅबियो कॅरुआनाला बरोबरीत रोखले.

बाडेन-बाडेन (जर्मनी) – भारताच्या विश्वनाथन आनंदने ग्रेन्के बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेत पहिल्या फेरीमध्ये सोमवारी इटलीच्या फॅबियो कॅरुआनाला बरोबरीत रोखले. कॅरुआनाने पांढ-या मोह-या घेऊन खेळताना इटालियन ओपनिंगचा अवलंब करत आनंदला सुरुवातीला चकवले. मात्र तरीदेखील काळ्या मोह-यांसह खेळताना आनंदने ३८ चालींमध्ये डाव बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले.

अन्य तीन पटलांवरील लढतीही बरोबरीत संपल्या. सगळ्यात लक्षवेधी लढत होती ती जगज्जेता नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन आणि आर्मेनियाचा लेवॉन अरोनियान. काळय़ा मोह-या घेऊन खेळणा-या कार्लसनला सुरुवातीला दडपणात आणणारी ही लढत ६४ चालींमध्ये बरोबरीत सुटली.

कारण ‘एंडगेम’ला वेळ कमी पडल्याने अरोनियानला झटपट चाली खेळाव्या लागल्या. त्याचा कार्लसनला बरोबरी साधण्यासाठी उपयोग झाला. स्पर्धेत आता चारही लढती बरोबरीत संपल्याने सहभागी आठही बुद्धिबळपटूंचे समान अर्धा गुण झाले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version