Home Uncategorized क्रिकेट विश्वचषक २०१५ विश्वचषकासाठी योग्य संघ निवडला नाही

विश्वचषकासाठी योग्य संघ निवडला नाही

0

उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानचे आव्हान संपल्यानंतर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे.

कराची – उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानचे आव्हान संपल्यानंतर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘‘मिसबा गेली पाच वर्षे कर्णधारपद भूषवत आहे. मात्र अजूनही त्याला विश्वचषकासाठी योग्य संघ निवडता आलेला नाही. हीच अतिशय निराशाजनक बाब आहे.

राहत अली आणि सोहेल खानसारख्या क्रिकेटपटूंचा विश्वचषकाच्या संभाव्य ३० जणांमध्येही समावेश नव्हता,’’ असे पाकिस्तानचा माजी फलंदाज मोहम्मद युसूफने म्हटले. ‘‘उपांत्यपूर्व फेरीत तरी पाकिस्तानच्या सध्याच्या संघाने मजल गाठली हीच मोठी बाब आहे. ऑस्ट्रेलियाकडून पराभव अपेक्षित होता. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेऊनही फलंदाजांनी चुकीचे फटके खेळले आणि विकेट गमावल्या. फलंदाजांचे कोणतेही नियोजन नव्हते,’’ असे पाकिस्तानचा माजी फलंदाज आमीर सोहेलने म्हटले.

‘‘पाकिस्तानच्या संघ व्यवस्थापनाने काही घोडचुका केल्या. त्यातच काही मुख्य क्रिकेटपटूंना झालेल्या दुखापतीही नुकसानकारक ठरल्या. त्यातच यष्टिरक्षक फलंदाज सर्फराज अहमद आणि अनुभवी फलंदाज युनूस खान यांना योग्यपद्धतीने वापरले नाही गेले,’ असे पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक रशीद लतीफने सांगितले.

विश्वचषकाला अवैध गोलंदाजी शैलीमुळे मुकलेला ऑफस्पिनर सईद अजमलनेही त्याच्या संघसहका-यांवर टीका केली आहे. ‘‘पाकिस्तानच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली. त्यातच फलंदाजांनी निवडलेले फटके तर अतिशय चुकीचे होते. उमर अकमल आणि सोहेब मकसूद हे फलंदाज काय करत होते तेच कळले नाही,’’ असे अजमलने म्हटले.

वहाब, वॉटसनला दंड
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वहाब रियाझच्या मानधनातून ५० टक्के तसेच ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू शेन वॉटसनच्या मानधनातून १५ टक्के रक्कम कापण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान यांच्यात शुक्रवारी झालेल्या लढतीत दोघांमध्ये शाब्दिक वादावादी झाली ऑस्ट्रेलिया फलंदाजी करताना ३३व्या षटकात पंचांची सूचना झुगारुन वॉटसन गोलंदाजी करणा-या वहाबशी वाद घालू लागला. अखेर ते षटक संपल्यावर वहाबने अपशब्द वापरले. त्यामुळे सामनाधिकारी रंजन मदुगले यांनी वहाब आणि वॉटसन यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version