Home देश विरोधी पक्षनेते पदासाठी खर्गेंनी घेतली सभापतींची भेट

विरोधी पक्षनेते पदासाठी खर्गेंनी घेतली सभापतींची भेट

0

लोकसभेत विरोधी पक्षनेत्याच्या निर्णयाबाबत लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी सभापती सुमित्रा महाजन यांची भेट घेतली.

नवी दिल्ली – लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदाच्या निर्णयाबाबत लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन  खर्गे यांनी बुधवारी सभापती सुमित्रा महाजन यांची भेट घेतली.

यासंबंधी यूपीएच्या ६० खासदारांच्य़ा स्वाक्ष-या असलेले पत्रक महाजन यांना सादर केले असल्याची माहिती खरगे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच याबाबत कधी निर्णय होईल अशी विचारणाही खर्गेनी केली.

खर्गे यांच्यासह काँग्रेसचे उपनेते अमरिंदर सिंग, ज्योतिरादित्य सिंदिया हे ही उपस्थित होते. यावेळी काँग्रेसने सादर केलेल्या पत्रकाबाबत सभापतींना लवकर निर्णय घेण्यास कोणताही अडथळा नसल्याचे मत खर्गे यांनी व्यक्त केले.

तसेच १९७७ च्या संसदीय कायद्यात देशातील मोठ्या पक्षाला विरोधी पक्षनेते पद दिले गेले पाहिजे असे स्पष्ट करण्यात आले आहे,असे खर्गे यांनी यावेळी सांगितले.

याआधी मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या खासदारांची बैठक घेतली होती. यावेळी सोनिया गांधीनी काँग्रेसलाच विरोधी पक्षनेतेपद मिळायला हवे असे ठाम मत व्यक्त केले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version