Home देश विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय चार दिवसांत घेणार

विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय चार दिवसांत घेणार

0

लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय पुढील चार दिवसात घेण्यात येईल असे लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बुधवारी सांगितले.
नवी दिल्ली – लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय येत्या चार दिवसात घेण्यात येईल असे लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बुधवारी सांगितले.

लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय सभापती घेऊ शकत नाही. यासाठीचे नियम पाळणे गरजेचे असते. अ‍ॅटर्नी जनरल यांचे यासंदर्भातील पत्र आल्यानंतर याबाबतचा निर्णय घेता येईल. पुढील चार दिवसांत याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित असल्याचे महाजन म्हणाल्या.

काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाजन यांची भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ५४३ जागांपैकी ४४ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपपाठोपाठ काँग्रेसकडेच सर्वाधिक खासदार आहेत. त्यामुळे लोकसभेत विरोधीपक्षनेतेपद मिळवण्यासाठी काँग्रेस आग्रही आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version