Home महामुंबई विधान परिषदेच्या चार जागा रिक्त

विधान परिषदेच्या चार जागा रिक्त

0

विधानपरिषदेच्या चार जागा रिक्त झाल्या असून त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा, अशी विनंती विधिमंडळ सचिवालयातर्फे निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे.

मुंबई – विधानपरिषदेच्या चार जागा रिक्त झाल्या असून त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा, अशी विनंती विधिमंडळ सचिवालयातर्फे निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे. तसे पत्र विधिमंडळ सचिव अनंत कळसे यांनी देण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विनोद तावडे आणि आशिष शेलार हे विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांनी विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तर विनायक मेटे यांच्यावर पंक्षातर्गत बंदी कायद्यानुसार कारवाई झाल्याने त्यांना आपले विधानपरिषद सदस्यत्व गमवावे लागले आहे. त्यामुळे या चार जागा रद्द झाल्या आहेत. पुढील सहा महिन्यांत ही निवडणूक अपेक्षित आहे.

विधानसभा निवडणुकीत विधानपरिषदेतील विद्यमात तीन सदस्य निवडून आल्याने त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तर विनायक मेटे हे राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर गेले होते. मात्र त्यांनी बीड विधानसभा मतदार संघातून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार रद्द करण्यात आले आहे. अशा चार जाग सध्या रिक्त आहेत. त्या जागावंर निडणूक आयोगाने निवडणूक घ्यावी असे विधिमंडळ सचिवालयातर्फे कळवण्यात आले आहे.

या सदस्यांच्या एकूण शिल्लक कालावधीनुसार या निवडणूका आयोगामार्फत जाहीर केल्या जातील, असे राज्याचे मुख्यनिवडणूक अधिकारी नितिन गद्रे यांनी सांगितले. मात्र हा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेईल. त्याची कल्पना परस्पर विधिमंडळ सचिवालयाला दिली जाईल, असेही ते म्हणाले. पुढील सहा महिन्यांत या निवडणूका होण्याची शक्यता आहे. मात्र त्या एकाच वेळी होतील की नाही हे सर्वस्वी निवडणूक आयोगावर अवलंबून रहाणार आहे. हे चार ही सदस्य विधानसभा सदस्यांद्वारे निवडून आले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version