Home देश विधानसभेच्या तारखा पुढील आठवड्यात जाहीर

विधानसभेच्या तारखा पुढील आठवड्यात जाहीर

0

निवडणूक आयोग पुढील आठवड्यात महाराष्ट्र, हरयाणा राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे.   

नवी दिल्ली – निवडणूक आयोग पुढील आठवड्यात महाराष्ट्र, हरयाणा राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे.

येत्या आठ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा तर २७ ऑक्टोबरला हरयाणा विधानसभेची मुदत संपणार आहे. तर झारखंड आणि जम्मू-काश्मीर विधानसभेची मुदत अनुक्रमे तीन आणि १९ जानेवारीला संपणार आहे.

महाराष्टात पुढील दोन महिन्यात गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी हे सण येत आहेत. त्यामुळे सणांच्या वेळी केला जाणारा पोलिस बंदोबस्त आणि आचारसंहितेचा विचार करुन निवडणुकीच्या तारखा निश्चित केल्या जाणार आहेत.

तसेच झारखंडमधील नक्षलवाद्यांच्या प्रभाव आणि काश्मीरमधील कडाक्याची थंडी या बाबी विचारात घेऊन झारखंड आणि जम्मू-काश्मीरमधील निवडणुकांच्या तारखांची निश्चिती केली जाणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version