Home टॉप स्टोरी बिगुल वाजले, आचारसंहिता लागू- दिवाळीपूर्वी नवे सरकार येणार

बिगुल वाजले, आचारसंहिता लागू- दिवाळीपूर्वी नवे सरकार येणार

0

मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतरची संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा शुक्रवारी करण्यात आली.

नवी दिल्ली- मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतरची संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा शुक्रवारी करण्यात आली.  नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणुक आयुक्त व्ही.एस.संपत यांनी शुक्रवारी महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. या दोन्ही राज्यातील मतदान प्रक्रिया २७ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण होणार असल्याचे संपत यांनी सांगितले.या घोषणेसह राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी १५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.  विधानसभेसह राज्यातील बीड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक ही यावेळी घेतली जाणार आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाल्यामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी मतदार याद्यांमध्ये नाव नसल्यामुळे अनेकांना मतदान करता आले नव्हते. त्यामुळेच यावेळी निवडणूक आयोगाने अखेरपर्यंत मतदार याद्या अपडेट केल्या जाणार आहेत. १५ ऑक्टोबर रोजी राज्यातील आठ कोटी २५ लाख ९० हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणुकीसाठी राज्यात ९० हजार ४०३ मतदान केंद असतील असे संपत यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या आदेशानुसार उमेदवारांना अर्ज भरताना सर्व रकाने भरणे आवश्यक असल्याचे संपत यांनी सांगितले. २० ऑक्टोबर रोजी निवडणुकीची अधिसुचना काढण्यात येईल.  २७ सप्टेंबर हा अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे. तर एक ऑक्टोबर हा अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे. विशेष म्हणजे राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी प्रथमच ‘नोटा’चा वापर होणार आहे.

तर हरयाणातील ९० जागांसाठीही १५ ऑक्टोबर रोजी मतदान आणि १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.  

महाराष्ट्र आणि हरयाणासह अरुणाचल, मणिपूर, नागलँड, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक याच तारखांना होणार आहेत. तर ओदिशामधील कंधमाल लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक घेतली जाणार असल्याचे संपत यांनी सांगितले.

» विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले
» राज्यात आचारसंहिता लागू
» महाराष्ट्रात १५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार
» राज्यात एका टप्प्यातच होणार मतदान
» १९ ऑक्टोबर रोजी होणार मतमोजणी
» २७ सप्टेंबर अर्ज भरण्याचा अंतिम दिवस
» एक ऑक्टोबर अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस
» मुख्य निवडणुक आयुक्त व्ही. ए. संपत यांनी केली घोषणा
» महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन राज्यात होणार विधानसभा निवडणुका
» मतदार याद्या शेवटच्या दिवसापर्यंत होणार अपडेट
» राज्यात आठ कोटी २५ लाख ९० हजार मतदार
» २७ ऑक्टोबर पूर्वी मतदान प्रक्रिया पूर्ण होणार
» महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी प्रथमच ‘नोटा’चा वापर होणार
» राज्यात ९० हजार ४०३ मतदान केंद्र
» उमेदवारांना अर्ज भरताना सर्व रकाने भरणे आवश्यक
» निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी आयोगाकडून नियंत्रक
» प्रत्येक जिल्ह्यात एक मॉ़डेल मतदान केंद्र

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version