Home देश जम्मू-काश्मीर, झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार

जम्मू-काश्मीर, झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार

0

निवडणूक आयोग आज जम्मू-काश्मीर आणि झारखंड या राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित करण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर निवडणूक आयोग आज जम्मू-काश्मीर आणि झारखंड या राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित करण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाने आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेत जम्मू-काश्मीर आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली जाणार आहे. जम्मू-काश्मीर विधानसभेची मुदत १९ जानेवारी तर झारखंड विधानसभेची मुदत तीन जानेवारीला संपणार आहे.

दोन्ही राज्यातील सुरक्षेच्या स्थितीचा मुद्दा लक्षात घेता निवडणूक आयोगाकडून अनेक टप्प्यांत निवडणूक घेण्याबाबतची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version