Home विदेश विकिलिक्सला कागदपत्रे पुरवणा-या मॅनिंगला ३५ वर्षाची शिक्षा

विकिलिक्सला कागदपत्रे पुरवणा-या मॅनिंगला ३५ वर्षाची शिक्षा

0

विकिलिक्स या समूहाला अमेरिकेच्या संरक्षणविषयक मोहिमांची माहिती असलेली कागदपत्रे दिल्याप्रकरणी ब्रॅडले मॅनिंग्ज या गुप्तहेराला तेथील लष्करी न्यायालयाने बुधवारी ३५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.

इंटरनेटवर विविध प्रकारची गुप्त माहिती उघड करणा-या विकिलिक्स या समूहाला अमेरिकेच्या संरक्षणविषयक मोहिमांची माहिती असलेली कागदपत्रे दिल्याप्रकरणी ब्रॅडले मॅनिंग्ज या गुप्तहेराला तेथील लष्करी न्यायालयाने बुधवारी ३५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.

गेल्या महिन्यात मॅनिंगला अनेक आरोपांखाली दोषी ठरवण्यात आले होते. त्यामध्ये गुप्तहेर कायद्याचा भंग केल्याच्या आरोपाचाही समावेश होता. इराकमध्ये कार्यरत असलेल्या लष्करी तळावर गुप्तचर अधिकारी म्हणून तैनात असताना अनेक कागदपत्रांच्या प्रती तयार करून त्या अनधिकृत व्यक्तींना वितरित केल्याबद्दल त्याला दोषी ठरवले आहे.

या आरोपांखाली मॅनिंगला ९० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता होती. मात्र, बुधवारी त्याला ३५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. पॅरोलवर तुरुंगातून बाहेर येण्यासाठी मॅनिंगला एकूण शिक्षेच्या एक तृतीयांश म्हणजेच कमीत-कमी बारा वर्षे शिक्षा भोगावी लागणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version