Home मनोरंजन वर्षा – मानसी म्हणतात, भविष्याची ऐशी तैशी

वर्षा – मानसी म्हणतात, भविष्याची ऐशी तैशी

0

वर्तमानपत्रं, मासिकं, पुस्तकं आणि आता टेलिव्हिजनसुद्धा भविष्यावर बोलू काही म्हणत वर्षानुवर्षे लोकांचं भविष्य सांगताना दिसत आहेत. एखाद्या व्यसनाप्रमाणे करोडो लोकं ते वाचत/बघत असतात. बरं लिहिलं नसेल तर ते चुकचुकतात आणि बरं लिहिलं असेल तर थोडा वेळ आनंदी होतात. जगात हात, नाडी, कपाळ, चेहरा, पत्रिका, कुंडली इ. बघून लोकांची भविष्य सांगणारे बरेच भविष्यवेत्ते समाजात सर्व थरांतून सापडतात. ब-याच ढोंगी ‘बाबांमुळे’ अशा लोकांवरचा लोकांचा विश्वास उडत चाललाय.

परंतु या शास्त्राला विज्ञानाची जोड देत भविष्य चांगलं होण्यासाठी वर्तमानात उपाय सांगणारे ज्योतिषीही कार्यरत आहेत आणि त्यांच्या ज्ञानत्वाचा आधार घेणारे मोठमोठय़ा व्यक्तीही आहेत. याच विषयावर सखोल व अभ्यासपूर्ण लेखन चंद्रा तलवारे यांनी केलं असून त्यावर रमेश तलवारे एका चित्रपटाची निर्मिती करीत आहेत ज्याचं नाव आहे‘भविष्याची ऐशी तैशी – द प्रेडिक्शन’. रमेश तलवारे मुव्हीज प्रस्तुत या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा वाहिली आहे सुरेंद्र वर्मा यांनी.

या चित्रपटात प्रमुख भूमिकेत वर्षा उसगांवकर, मानसी नाईक, रुचिता जाधव, हर्षाली झिने, लिम्का बुकमध्ये रेकॉर्ड झालेले ज्योतिषाचार्य संदीप कोचर, आसावरी जोशी, स्वप्नील जोशी (नवीन), पंकज विष्णू, आनंदा कारेकर, किशोर नांदलस्कर, तसेच प्रवीण तलवारे यांनी  विशेष  भूमिका  साकारली आहे. येत्या  ६ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात  “भविष्याची ऐशी तैशी -द प्रेडिक्शन” प्रदर्शित होणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version