Home देश लोकसभेत ‘पंकजा मुंडे’..

लोकसभेत ‘पंकजा मुंडे’..

0

चिक्की घोटाळा प्रकरणात महाराष्ट्र विधानसभेत आज एक आणि उद्या एक अशी निवेदने करणा-या पंकजा मुंडे यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या डोक्यावर हात ठेवला.

नवी दिल्ली- चिक्की घोटाळा प्रकरणात महाराष्ट्र विधानसभेत आज एक आणि उद्या एक अशी निवेदने करणा-या पंकजा मुंडे यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या डोक्यावर हात ठेवला. त्यामुळे ‘मी ललित मोदींना मदत केली नाही’ असे गेल्या आठवडयात सांगणा-या सुषमा स्वराज यांनी आज पलटी मारली आणि मोदींच्या बायकोला मी मदत केली, असे सांगितले आणि तेही मानवतेच्या दृष्टीने. त्यामुळे महाराष्ट्राच्या पंकजा मुंडे स्वराज बाईंच्या मुखातून बोलत आहेत, असेच सभागृहाला वाटून गेले.

ललित मोदी याला केलेल्या मदतीप्रकरणी वादात सापडलेल्या सुषमा स्वराज यांनी गुरुवारी लोकसभेत निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी ‘मी ललित मोदी यांना कोणतीही बेकायदेशीर मदत केली असेल तर त्याचा एकतरी पुरावा सादर करा’, असे उलटे आव्हान विरोधकांना दिले.

तसेच आपल्यावर करण्यात येत असलेले आरोप धादांत खोटे, चुकीचे व निराधार असून आपण ललित मोदी यांना नव्हे तर त्यांच्या कॅन्सरने आजारी असलेल्या पत्नीला उपचारांसाठी मानवतेच्या दृष्टीकोनातूनच मदत केली. ती जर बेकायदेशीर आहे असे संसदेला वाटत असेल, तर होय मी अपराध केला आहे, आणि त्यासाठी संसद देईल तो निर्णय स्वीकारण्यास मी तयार आहे, अशी भावनिक नौटंकीही त्यांनी केली.

त्या परिस्थितीत माझ्या ठिकाणी सोनिया गांधी असत्या तर त्यांनी काय केले असते, असा प्रतिप्रश्नही त्यांनी यावेळी केला. ललित मोदी यांची पत्नी कॅन्सरने आजारी असल्याने मी त्यांना फक्त माणुसकीच्या नात्याने सहकार्य केले. संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यापासून मी दोन्ही सभागृहात बसून आहे.

मात्र मला माझी बाजू मांडण्याची संधी न देता विरोधकांनी गदारोळ केला. हा माझ्यावर झालेला अन्याय आहे, तसेच माझे ग्रह सध्या फिरले आहेत, माझ्यावर माझेच सहकारी आरोप करत आहेत, असेही त्या म्हणाल्या. स्वराज यांनी ललित मोदींना केलेल्या मदतीच्या मुद्यावरून विरोधकांनी स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. या मागणीसाठी मागील तीन आठवडयांपासून काँग्रेससह सर्व विरोधकांनी संसदेचे कामकाज रोखून धरले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version