Home टॉप स्टोरी लोकसभा निवडणूक, भाजपाचा खर्च ७१२ कोटी रुपये

लोकसभा निवडणूक, भाजपाचा खर्च ७१२ कोटी रुपये

0

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्यावर केंद्रात सत्तारुढ झालेल्या भाजपा पक्षाने निवडणुकीत तब्बल ७१२ रुपये कोटी खर्च केले होते

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्यावर केंद्रात सत्तारुढ झालेल्या भाजपा पक्षाने निवडणुकीत तब्बल ७१२ रुपये कोटी खर्च केले होते. तर काँग्रेसने या निवडणुकीत ४८६.२१ कोटी रुपये आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ६४.४८ कोटी रुपये खर्च केले होते.

२००४ ते २०१४ या दहा वर्षांत या राजकीय पक्षांकडून जमा होणा-या निधीतही ४१८ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर खर्चात सुमारे ३८६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

२००४ मधील लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांकडून गोळा करण्यात आलेला निधी २२३.८० कोटी रुपये इतका होता. २००९मधील लोकसभा निवडणुकीत या निधीत २८२ टक्क्यांनी वाढ होत तो ८५४.८९ कोटींवर पोहोचला. तर २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या निधीमध्ये ३५.५३ टक्क्यांची वाढ होत हा एक हजार १५८.५९ इतका झाला.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक निधी भाजपाकडून जमा झाला. निवडणुकीच्या ७५ दिवसांमध्ये सुमारे ५८८.४५ कोटी रुपये भाजपाने जमा केले. तर काँग्रेसने ३५०.३९ कोटी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ७७.८५ कोटी रुपयांचा निधी गोळा केला. सीपीआयने सर्वात कमी म्हणजे ९.५२ कोटी रुपयांचा निधी जमा केला.

या सर्व राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी खर्च करण्यात आलेल्या रकमाही तितक्याच मोठ्या आहेत. भाजपाने ७५ दिवसांत ७१२.४८ कोटी रुपये खर्च केले. त्यापाठोपाठ काँग्रेसने ४८६.२१ कोटी रुपये आणि राष्ट्रवादीने ६४.४८ कोटी रुपये खर्च केले. सीपीआयने निवडणूक कालावधी दरम्यान सर्वात कमी ६.७२ कोटी रुपये खर्च केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version