Home ताज्या घडामोडी लोअर परळ पुलाचा तिढा अखेर सुटला

लोअर परळ पुलाचा तिढा अखेर सुटला

0

महापालिका, रेल्वेकडून संयुक्त पूल बांधणी

मुंबई – मुंबईतील लोअर परेलमधील वाहतुकीसाठी बंद केलेला पूल कोणी बांधायचा याबाबतचा तिढा अखेर सुटला आहे. मुंबई महापालिका हद्दीतील पूल महापालिका बांधणार आणि रेल्वेच्या हद्दीतील पूल रेल्वे बांधणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्यातील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली होती. या पुलाचे डिझाईन रेल्वे करणार असल्याचेही बैठकीत निश्चित झाले.

मुंबईतील अंधेरीच्या गोखले पुलाचा स्लॅब कोसळल्यानंतर रेल्व प्रशासन, आयआयटी मुंबई आणि महापालिका अधिकारी यांनी केलेल्या सेफ्टी ऑडिटनंतर लोअर परेल रेल्वे ब्रिज हा धोकादायक असून तो बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेसाठी लोअर परेल रेल्वे ब्रिज (ना. म. जोशी मार्ग) २४ जुलैपासून हा वाहनांना वाहतुकीसाठी आणि पादचा-यांसाठी बंद करण्यात आला होता. दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत ब्रिज बंद राहणार आहे.

परंतु तीन दिवसांनी हा पूल पादचा-यांसाठी खुला करण्यात आला. पूल बंद केल्याने स्थानिक नागरिकांनी मनस्तापाला सामोरं जावं लागत असल्याची ओरड केली होती. यानंतर महापालिका, रेल्वे, आयआयटी आणि स्थानिक प्रतिनिधींनी पुन्हा या ब्रिजची पाहणी केली. त्यानंतर केवळ पादचा-यांसाठी हा ब्रिज पुन्हा खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version