Home टॉप स्टोरी ललित मोदीच्या पाठिशी भाजपा सरकार?

ललित मोदीच्या पाठिशी भाजपा सरकार?

0
संग्रहित छायाचित्र

लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सभागृहात जोरदार भाषण करत ललित मोदी संबंधातील सरकारची मवाळ भूमिका सिध्द करुन दाखवली आणि मोदी सरकारला उघडे पाडले.

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली – ललित मोदी प्रकरणावर बुधवारी लोकसभेत चर्चा करताना काँग्रेसने नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सभागृहात जोरदार भाषण करत ललित मोदी संबंधातील सरकारची मवाळ भूमिका सिध्द करुन दाखवली आणि मोदी सरकारला उघडे पाडले.

ललित मोदीला मदत करणा-या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या संदर्भात खर्गेनी सरकारला सात प्रश्न विचारले असून, याची उत्तरे पंतप्रधानांनी द्यावी अशी मागणी केली.

सुषमा स्वराज यांच्यावर आरोप होत असताना त्या समोरच्या बाकावर बसल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी सभागृहात उपस्थित नव्हते. पंतप्रधान कान, डोळे आणि तोंड बंद करुन मूक बनले आहेत असा आरोप त्यांनी केला.

त्यांनी आधीच या विषयावर भाष्य केले असते तर ही वेळ आलीच नसती. पासपोर्ट प्रकरणात ललित मोदीला जो दिलासा मिळाला त्या निर्णयाला आव्हान का देण्यात आले नाही ? पंतप्रधान, तुम्ही का गप्प आहात ? निश्चित यात काही तरी असले पाहिजे असा आरोप खर्गेंनी केला.

ललित मोदींची पत्नी कर्करोगाने ग्रस्त असल्याने मानवतेच्या आधारावर त्यांनी ललित मोदींना मदत केल्याचे स्वराज यांनी मागच्या आठवडयात सभागृहाला सांगितले.

कुठल्या आधारावर सुषमा स्वराज यांनी ललित मोदींना मदत केली ? मानवतेचा कायदा आणि मानवतेचा आधार या दोन्ही बाबी सारख्या नाहीत. ललित मोदी मिळालेल्या परवानगीचा आधार घेऊन तो अन्य देशांमध्ये गेला. तिथल्या महागडया रिसॉटर्समध्ये राहिला, विवाहसोहळयाला उपस्थित राहिला.

मानवतेच्या आधारावर ४६० कोटींचा घोटाळा करणा-या आरोपीला तुम्हाला संरक्षण द्यायचे आहे ? असा सवाल करत मोदी सरकारच्या कामकाजाचे वाभाडे काढले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version