Home टॉप स्टोरी लंडनमध्ये विजय मल्ल्या- अटक व सुटका

लंडनमध्ये विजय मल्ल्या- अटक व सुटका

0

भारतात बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून परदेशात पसार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याला मनी लाँड्रिंग प्रकरणी लंडनमध्ये अटक करण्यात आली. मात्र न्यायालयात हजर केले असता त्याची त्वरीत जामिनावर सुटका करण्यात आली.

लंडन- भारतात बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून परदेशात पसार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याला मनी लाँड्रिंग प्रकरणी लंडनमध्ये अटक करण्यात आली. मात्र न्यायालयात हजर केले असता त्याची त्वरीत जामिनावर सुटका करण्यात आली.

ब्रिटिश पोलिसांनी ही कारवाई केली. या वृत्ताला ब्रिटनच्या क्राऊन प्रोसिक्युशन सर्व्हिस आणि सीबीआयने दुजोरा दिला.

तसेच अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) अर्जानंतर लंडनमध्ये अटक करण्यात आल्याचे वृत्त ‘दूरदर्शन’ने दिले. तसेच विजय मल्ल्याचा ताबा मिळवण्यासाठी भारताकडून आता प्रयत्न केले जातील. तशी परवानगी मिळाल्यास विजय मल्ल्याला भारतात आणले जाईल, असे ही या वृत्तात म्हटले.

दरम्यान, विजय मल्ल्याला लंडनमध्ये अटक करण्याची ही दुसरी वेळ आहे. एप्रिल महिन्यात विजय मल्ल्याला अटक करण्यात आली होती. भारताने विजय मल्ल्याचे भारतात प्रत्यार्पण करण्याची विनंती केल्यानंतर ही अटकेची कारवाई झाली होती. मात्र अटक झाल्यानंतर लगेचच त्याला जामीन मंजूर झाला होता.

आता पुन्हा एकदा विजय मल्ल्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आल्याचे वृत्त येथील प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

[EPSB]

देशातील अनेक बँकांचे जवळपास नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवणारा मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या अडचणी वाढल्या आहेत.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version