Home महामुंबई रेल्वेचा पेपरलेस पास सप्टेंबरमध्ये

रेल्वेचा पेपरलेस पास सप्टेंबरमध्ये

0

मुंबईतील तिकिटांच्या रांगा कमी करण्यासाठी पेपरलेस तिकीट सेवा सुरूकेल्यानंतर आता मासिक पासही मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.

मुंबई – मुंबईतील तिकिटांच्या रांगा कमी करण्यासाठी पेपरलेस तिकीट सेवा सुरूकेल्यानंतर आता मासिक पासही मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. येत्या सप्टेंबरपासून मध्य रेल्वेवर ही योजना सुरू होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे रांगेत उभे राहून मासिक पास काढण्याच्या त्रासापासून प्रवाशांची सुटका होणार आहे.

मुंबईतील रेल्वे स्थानकांतील तिकिटांच्या रांगा कमी करण्यासाठी रेल्वेकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. यामध्ये स्थानकातील तिकीट खिडक्या, एटीव्हीएम मशिन्स, जनसाधारण तिकीट बुकिंग सेवक (जेटीबीएस), मोबाईल तिकीट हे पर्याय आहेत. यामध्ये मोबाईल तिकीट पश्चिम रेल्वेवर उपलब्ध असल्याने प्रवाशांना या योजनेचा चांगला फायदा होत आहे. येत्या काही काळात मध्य रेल्वे मार्गावर देखील पेपरलेस तिकीट योजना सुरू करण्यात येणार आहे. मुंबईत प्रवास करणा-या प्रवाशांमध्ये मासिक

पासधारकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पेपरलेस तिकिटांसोबत पेपरलेस मासिक पासची सुविधा उपलब्ध झाल्यास लाखो मासिक-त्रमासिक पासधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे पेपरलेस मासिक पासामुळे पासची छापील प्रत बाळगण्याची गरज राहणार नाही. सध्या पेपरलेस मासिक पासची चाचणी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिली.

कसा काढाल मासिक पास

» पहिलाच पास काढणा-या प्रवाशांना पहिला पास तिकीट खिडकीवरच काढावा लागणार आहे.
» त्यानंतरचा मासिक पास मोबाईल रेल्वेच्या अॅपद्वारे काढता येईल.
» पेपरलेस मासिकपासासाठी प्रवाशांना अॅपमध्ये रेल्वेच्या ओळखपत्रासह मोबाईल क्रमांकही नोंदवावा लागणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version