Home क्रीडा रिव्हर्स स्विंग रिव्हर्स स्विंग- ३० जानेवारी २०१४

रिव्हर्स स्विंग- ३० जानेवारी २०१४

0

जाणून घ्या क्रिकेटच्या इतिहासात २८ जानेवारी रोजी घडलेले रंजक किस्से 

१८८३

इंग्लंडने सध्याच्या रूढ स्वरूपात अ‍ॅशेस परत मिळवल्या. १८८२मध्ये मायदेशी मालिका गमावल्यानंतर इंग्लिश क्रिकेटची तेथील वृत्तपत्रांनी यथेच्छ नालस्ती केली होती. इंग्लिश क्रिकेटला ‘संडे टाइम्स’ने ‘श्रद्धांजली’ही वाहिली होती. पण ऑस्ट्रेलियात वर्षभराने झालेली मालिका इव्हो ब्लायच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघाने २-१ अशी जिंकली. मेलबर्नमधील काही महिलांनी तिस-या कसोटीत वापरलेल्या बेलची राख एका कुपीत भरून ब्लायला दिली. हीच कुपी किंवा अर्न पुढे अ‍ॅशेस म्हणून मान्यता पावली!


१९२९
दक्षिण आफ्रिकेचे सर्वाधिक यशस्वी आणि प्रसिद्ध फिरकी गोलंदाज ह्यू टेफील्ड यांचा जन्म. ऑफस्पिनर टेफील्ड चेंडूला भरपूर उंची देत आणि त्यांचा टप्पाही अचूक असे. टेफील्ड यांनी ३७ कसोटी सामन्यांत २६च्या सरासरीने १७० विकेट्स घेतल्या. इंग्लंडविरुद्ध १९५६-५७मध्ये जोहान्सबर्ग कसोटीत ११३ धावांमध्ये नऊ विकेट्स ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी. त्यांच्या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेने तो सामना जिंकला. त्या मालिकेत पुढील सामन्यातही त्यांनी ७८ धावांत सहा विकेट्स घेऊन दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला.


१९४२
इंग्लंडचे गोलंदाज डेव्हिड ब्राउन यांचा जन्म. ते २६ कसोटी सामने खेळले. यांत २८.३१च्या सरासरीने त्यांनी ७९ विकेट्सच घेतल्या. पण परदेशी मैदानांवर त्यांची कामगिरी अधिक चांगली होत असे.


१९९१
कर्टली अँबरोजने उडवली ऑस्ट्रेलियाची दाणादाण! वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थमध्ये झालेला कसोटी सामना केवळ एका स्पेलमध्ये निर्णायक ठरला. सामन्याच्या या पहिल्याच दिवशी अँबरोजने ३२ चेंडूंमध्ये अवघी एक धाव देत ऑस्ट्रेलियाचे सात फलंदाज टिपले! त्यामुळे दोन बाद ८५वरून ऑस्ट्रेलियाचा डाव ११९ धावांमध्ये कोसळला. त्या दिवसअखेर वेस्ट इंडिजने एक बाद १३५ धावा करून सामन्यावर पकड घेतली. तिस-या दिवशी उपाहारापूर्वीच सामना संपला. ऑस्ट्रेलियन कर्णधार अ‍ॅलन बॉर्डर दोन्ही डावांमध्ये शून्यावर बाद झाला!


१९९४
कपिलदेव यांनी त्यावेळच्या सर्वाधिक कसोटी बळींच्या सर रिचर्ड हॅडलींच्या विक्रमाशी बरोबरी केली. बंगळूरु येथे श्रीलंकेच्या डॉन अनुरासिरीला बाद करून कपिलदेव यांनी ४३१वा बळी मिळवला. ती कसोटी भारताने डावाने जिंकली.


२०००
इंग्लंडच्या मार्क ईलहॅमने झिम्बाब्वेविरुद्ध १५ धावांमध्ये पाच विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे हे पाचही बळी पायचीतचे होते आणि एकही निर्णय वादग्रस्त नव्हता! इंग्लंडसाठी तो विक्रम ठरला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version