Home क्रीडा रिव्हर्स स्विंग रिव्हर्स स्विंग- २२ऑगस्ट २०१३

रिव्हर्स स्विंग- २२ऑगस्ट २०१३

0

क्रिकेटच्या मैदनावर घडलेले रंजक किस्से 


१८८१
आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट आणि फुटबॉल खेळलेले इंग्लंडचे माजी फलंदाज हॅरी मेकपिस (१८८१-१९५२) यांचा जन्म. चार कसोटी सामने ते खेळले.


१८९६
के. एस. रणजितसिंगजी (१८७२-१९३३) यांनी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ससेक्सकडून खेळताना यॉर्कशायरतर्फे एकाच दिवशी दोन शतके (१०० आणि नाबाद १२५ धावा) झळकावली.

चेल्टनहॅम येथे ऑस्ट्रेलिया संघाने ग्लुस्टरशायरला अवघ्या १७ धावांमध्ये गुंडाळले. डोमेस्टिक क्रिकेटमधील ही सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली.


१८९७
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार विल्यम वुडफुल (१८९७-१९६५) यांचा जन्म. त्यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने दोन वेळा (१९३० आणि १९३४) अ‍ॅशेस मालिका जिंकल्या. विशेष म्हणजे त्या दोन्ही वेळेला वुडफुल यांचा वाढदिवस होता.


१९१२
ओव्हल कसोटीत ऑस्ट्रेलियाचा अवघ्या ६५ धावांमध्ये खुर्दा उडवतानाच २४४ धावांनी इंग्लंडने तीन देशांचा सहभाग असलेल्या तिरंगी स्पर्धेचे जेतेपद पटकवले. तीन कसोटी संघांचा समावेश असलेली ती एकमेव तिरंगी स्पर्धा होती. दक्षिण आफ्रिकेने तिसरे स्थान फटकावले.


१९३०
डॉन ब्रॅडमन यांच्या द्विशतकामुळे (२३२) ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धची ओव्हल कसोटी डावाने जिंकतानाच अ‍ॅशेस मालिका दोन-एक अशी खिशात घातली.


१९३४
ऑस्ट्रेलियाचे विल्यम पोन्सफर्ड आणि इंग्लंडचे फ्रॅँक वुली यांची क्रिकेटमधून निवृत्ती. ओव्हलवर कारकीर्दीतील शेवटच्या कसोटीत पोन्सफर्ड यांनी २६६ धावा फटकावत ब्रॅडमन यांच्यासोबत ४५१ धावांची विक्रमी भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाने त्या कसोटीत ५६२ धावांनी मोठा विजय मिळवला. वुली यांच्यावर त्याच सामन्यात यष्टिरक्षणाची जबाबदारी आली. त्यांनी विक्रमी ३७ ‘बाइज’ धावा दिल्या.


१९९२
ऑस्ट्रेलियाविरुद्धची कोलंबो कसोटी जिंकण्यासाठी श्रीलंकेला अवघ्या ५४ धावांची गरज होती. आठ विकेट्स शिल्लक असल्याने यजमानांचा विजय नक्की मानला जात होता. मात्र लेगस्पिनर शेन वॉर्न (११-३) आणि तेज गोलंदाज ग्रेग मॅथ्यूजच्या (७६-४) प्रभावी गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने प्रतिस्पध्र्यावर १६ धावांनी मात करत एका ‘धक्का’दायक विजयाची नोंद केली.


२००९
इंग्लंडचा दर्जेदार फलंदाज जोनाथन ट्रॉटने (११९) ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओव्हलवर पदार्पणात शतक काढले. पदार्पणातच शतक झळकावणारा तो इंग्लंडचा १८वा फलंदाज ठरला.


२०११
इंग्लंड कसोटीत अव्वल स्थानी.. ओव्हलमधील अंतिम कसोटी एक डाव आणि आठ धावांनी जिंकत इंग्लंडने भारताचा ४-० असा धुव्वा उडवला. सात वर्षानी इंग्लंडला असे निर्भेळ यश मिळवता आले. इयन बेलचे कारकीर्दीतील पहिलेच द्विशतक आणि केविन पीटरसनसोबत त्याने केलेली ३५० धावांची भागीदारी यजमानांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्टय केले. भारताने मालिकेत प्रथमच तीनशेपार धावा केल्या तरी डावाचा पराभव टाळण्यात अपयश आले. निर्भेळ यशासह इंग्लंडने कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version