Home महाराष्ट्र राष्ट्रपतींनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद!

राष्ट्रपतींनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद!

0

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी देशभरातील केंद्रीय विद्यापीठे, आयआयटी, एनआयटी तसेच इतर केंद्रीय शिक्षण संस्थांतील विद्यार्थी आणि शिक्षकांशी व्हीडियों काँन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

वर्धा- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी देशभरातील केंद्रीय विद्यापीठे, आयआयटी, एनआयटी तसेच इतर केंद्रीय शिक्षण संस्थांतील विद्यार्थी आणि शिक्षकांशी व्हीडियों काँन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

राष्ट्रपतींनी थेट राष्ट्रपती भवनातून आपला संदेश देशभरातील ४०० हून अधिक ठिकाणी असलेल्या संस्थांतील विद्यार्थी व शिक्षकांना दिला. या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठातील हबीब तन्वीर सभागृहात करण्यात आले होते.

प्रारंभी राष्ट्रपतींनी नवीन शैक्षणिक सत्राकरता सर्वाना शुभेच्छा दिल्या. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. अब्दुल कलाम आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा उल्लेख करून विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले की, उज्ज्वल भारताच्या भविष्यासाठी उच्चशिक्षित आणि कौशल्यवान युवक आणि युवतींची गरज आहे.

विद्यार्थी घडवण्यात शिक्षकांचा महत्त्वाचा वाटा असतो आणि असे करण्यासाठी शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थी घडवले पाहिजेत. संस्थांनी आपल्या आसपासच्या गावांना दत्तक घेऊन आदर्श गाव बनवण्याची सुरुवात केली पाहिजे.

राष्ट्रपती याआधी जानेवारी २०१४ रोजी संबोधित केले होते. नॅशनल नॉलेज नेटवर्कच्या माध्यमातून आणि दिल्लीतील एनआयसीच्या तांत्रिक सहकार्याने राष्ट्रपती महोदयांच्या संवादाची दुसरी वेळ होती. ज्यातून कुलाध्यक्ष या नात्याने त्यांनी केंद्रीय विद्यापीठांशी संवाद साधला. या वेळी विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठया संख्येने हजर होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version