Home क्रीडा राष्ट्रकुल- भारताला कुस्तीमध्ये आणखी पाच पदके

राष्ट्रकुल- भारताला कुस्तीमध्ये आणखी पाच पदके

0

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग दुस-या दिवशी भारतीय कुस्तीपटूंचा दबदबा कायम राहीला मात्र त्यांना मंगळवार प्रमाणे सुवर्ण कामगिरी करता आली नाही.

ललिता

ग्लासगो- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग दुस-या दिवशी भारतीय कुस्तीपटूंचा दबदबा कायम राहीला मात्र त्यांना मंगळवार प्रमाणे सुवर्ण कामगिरी करता आली नाही.

स्पर्धेच्या सातव्या दिवसाच्या सुरुवातीला कुस्तीपटूंनी पाच रौप्य पदके निश्चित केली होती. मात्र भारताला रौप्य पदकाचे सुवर्णपदकामध्ये रुपांतर करण्यात अपयश आले. तर नवजोत कौरने कुस्तीत एक कांस्य पदक मिळवून दिले.

बुधवारी भारताच्या ललिता हिने ५३ किलो फ्रीस्टाईल वजनी गटात रौप्य पदक मिळवले. अंतिम फेरीत नायजेरियाच्या ओडूनायो हिने तिचा पराभव केला. पुरुषांच्या ६१ किलो फ्रीस्टाईलमध्ये बजरंग याने रौप्य पदक मिळवले. अंतिम फेरीत कॅनडाच्या कुस्तीपटूने त्याचा पराभव केला. तर साक्षी मलिक हिने ५८ किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवले.

पुरुषांच्या ९७ किलो फ्रीस्टाईल प्रकारात सत्यवर्त कडियान याने भारताला १९वे रौप्य पदक मिळवून दिले.

सत्यवर्त कडियान

तर ६९ किलो वजनी गटात नवजोत कौर हिने कांस्य पदकाची कमाई केली. कुस्तीपटूंच्या या कामगिरीमुळे भारताच्या पदकांचा संख्या ४१वर पोहचली आहे. यात १० सुवर्ण १९ रौप्य आणि १२ कांस्य पदकांचा समावेश आहे. तर पदकतालिकेत भारत सहाव्या स्थानावर आहे.

आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकायचेय

२०१६ रिओ ऑलिंपिकमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीचे लक्ष्य आहेच. मात्र आगामी जागतिक आणि आशियाई स्पर्धावर मी लक्ष केंद्रित केले आहे. दक्षिण कोरियात होणा-या आशियाई स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करण्याचा माझा इरादा आहे, असे भारताचा अव्वल कुस्तीपटू सुशील कुमारने बुधवारी सांगितले.

बॉक्सिंगमध्ये जांग्रा उपांत्य फेरीत

नवजोत कौर

ऑस्ट्रेलियाचा प्रतिस्पर्धी डॅनियल लुइस डोप चाचणीत दोषी आढळल्याने भारताच्या मनदीप जांग्राला ६९ किलो वजनी गटाची उपांत्य फेरी गाठता आली. सामन्यापूर्वीच लुइसचा डोपचा निकाल समोर आला.  भारताच्या अम्रितप्रीत सिंगला पुरुषांच्या ९१ किलो हेवीवेट गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला. त्याला स्कॉटलंडच्या स्टीफन लॅवेलीकडून पराभव पत्करावा लागला.

लोकसभेत अभिनंदन

राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्या क्रीडापटूंचे बुधवारी लोकसभेत अभिनंदन करण्यात आले. राष्ट्रकुलमधील पदकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याबद्दल सर्वच सदस्यांनी भारताच्या क्रीडापटूंचे कौतुक केले.

>बॅडमिंटन : पी. कश्यप,श्रीकांत किडांबी आणि आरएमवी गुरुसाइदत्तने पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
>महिलांमध्ये भारताच्या पी. वी. सिंधू आणि पी. सी. तुलसीने एकेरीची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.
>डायव्हिंग प्रकारात भारताचा कॉँगब्रेलपम पुरुषांच्या १ मीटर स्प्रिंगबोर्ड फायनलसाठी पात्र ठरू शकला नाही.
>महिलांच्या लांब उडी पात्रता फेरीत मयूखा जॉनी अपयशी ठरली.
>महिलांच्या ८०० मीटर उपांत्य फेरीसाठी भारताची टिंटू लुका पात्र ठरली. तिस-या हिटमध्ये तिने चौथे स्थान मिळवले.
>महिलांच्या हाय जंप प्रकारातील फायनलसाठी सहाना कुमारी पात्र ठरली.

ऑस्ट्रेलियाचे पदकांचे ‘शतक’

ऑस्ट्रेलियाने बुधवारी पदकांचे ‘शतक’ पूर्ण करण्याचा मान मिळवला. इंग्लंडही शतकापासून फार दूर नाही.

बोल्टकडून वृत्ताचे खंडन

राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनावरून नाराजी व्यक्त केल्याच्या वृत्ताचे जमैकाचा सर्वोत्कृष्ट वेगवान धावपटू उसेन बोल्टने खंडन केले. बोल्टने आयोजनावरून टीका करताना लंडनमधील ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन जास्त चांगले होते, असे म्हटल्याचे वृत्त आघाडीच्या दैनिकाने दिले होते. मात्र बोल्टने त्याचे ट्विटवरून खंडन केले. ‘‘सकाळी मी उठलो ती ही चुकीची बातमी वाचून. पत्रकारांनी हेडलाइन निर्माण करण्यासाठी या चुकीच्या बातम्या देऊ नयेत,’’ असे बोल्टने ट्विटवर लिहिले.

डोपिंगमुळे भारताच्या पदकांत भर
नायजेरियाची महिलांच्या ५३ किलो गटातील १६ वर्षीय वेटफिल्टर चिमा आम्लाहा डोप चाचणीत दोषी आढळल्याने तिचे सुवर्णपदक काढून घेण्यात आले आहे. मात्र त्याचा फायदा भारताच्या दोन वेटलिफ्टरना झाला. त्या वजनी गटात कांस्यपदक जिंकलेल्या संतोषी मात्साला रौप्यपदक मिळाले आहे. याउलट चौथ्या स्थानी समाधान मानावे लागलेल्या स्वाती सिंगला कांस्यपदकावर नाव कोरता आले. ते पाहता भारताच्या पदकांत आणखी एका पदकाची वाढ झाली आहे.याबरोबरच भारताच्या वेटफिल्टरकडून यंदाच्या राष्ट्रकुलमध्ये मिळवलेल्या पदकांची संख्या १२वर गेली. त्यात तीन सुवर्ण, चार रौप्य आणि पाच कांस्यपदकांचा समावेश आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version