Home देश राफेल लढाऊ विमान करार रखडणार ?

राफेल लढाऊ विमान करार रखडणार ?

0

फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या करारात पुन्हा एकदा अडचणी निर्माण झाल्या आहेत.

नवी दिल्ली – फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या करारात पुन्हा एकदा अडचणी निर्माण झाल्या आहेत.

चार महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या फ्रान्स दौ-यामध्ये राफेल लढाऊ विमानाच्या खरेदी करारातील कोंडी फोडली होती.

भारतीय वायूदलाची सध्याची गरज लक्षात घेऊन भारताने फ्रान्सकडून तात्काळ ३६ लढाऊ विमाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. मात्र आता विमानाची किंमत आणि राफेलच्या भारतातील निर्मितीसाठी गुंतवणूक करण्याच्या अटीवरुन या करारात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

राफेलचे उत्पादन करणारी डसॉल्ट एव्हिएशन कंपनी आणि सरकारी अधिका-यांमध्ये कराराच्या काही अटींवरुन मतभेद निर्माण झाल्याने ही खरेदी प्रक्रिया रखडण्याची शक्यता आहे अशी माहिती दोन वरिष्ठ संरक्षण अधिका-यांनी दिली.

त्यामुळे भारतीय वायूदलाच्या आधुनिकीकरणाला अधिक विलंब लागू शकतो. मूळ करार १२६ लढाऊ विमाने विकत घेण्याचा आहे. पण विविध कारणामुळे हा करार रखडला होता.

अखेर भारतीय वायूदलाची गरज लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी तात्काळ ३६ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. भारताचे शेजारी चीन आणि पाकिस्तान यांच्या वायूदलाची क्षमता वाढत असताना भारताकडेही त्याच तोडीची लढाऊ विमाने असणे आवश्यक आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version