Home टॉप स्टोरी राकेश मारियांचा राजीनाम्याचा विचार नाही

राकेश मारियांचा राजीनाम्याचा विचार नाही

0

मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरुन तडकाफडकी उचलबांगडी झाल्यामुळे राकेश मारिया नाराज असले तरी, राजीनामा देण्याचा त्यांचा विचार नाही.

मुंबई – मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरुन तडकाफडकी उचलबांगडी झाल्यामुळे राकेश मारिया नाराज असले तरी, राजीनामा देण्याचा त्यांचा विचार नाही.

राजीनाम्यासंबंधी प्रसिध्द झालेले वृत्त चुकीचे असून, राजीनामा देण्याचा माझा कोणताही विचार नाही असे मारिया यांनी वृत्तसंस्थेकडे स्पष्ट केले आहे.

मंगळवारी राकेश मारिया यांना होमागार्डच्या महासंचालकपदी बढती देण्याच्या नावाखाली मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरुन तडकाफडकी हटवण्यात आले. हायप्रोफाईल शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास महत्वाच्या टप्प्यावर असताना अचानक ही बदली झाल्यामुळे विविध तर्क-विर्तकांना उधाण आले आहे.

शीना बोरा हत्या प्रकरणाच्या तपासामुळे मारिया यांची बदली झाल्याचा आरोप झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने मंगळवारी संध्याकाळीच मारिया यांच्या नियंत्रणाखालीच शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास सुरु राहिल असे स्पष्ट केले.

या हत्या प्रकरणात मारिया यांनी लक्ष घातले असून त्यांनी स्वत:हा आरोपींची चौकशी केली आहे. उत्सवकाळात बदली करणे योग्य होणार नाही म्हणून त्यापूर्वी तात्काळ ही बदली केल्याचे गृहखात्याकडून सांगण्यात आले.

सोमवारी रात्री जपान दौ-यावर निघण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बदली केली. अहमद जावेद यांनी मारिया यांची जागा घेतली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version