Home महामुंबई ठाणे रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी मुरुम मातीचा वापर

रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी मुरुम मातीचा वापर

0

वाहतुकीस कायम त्रासदायक असलेला रस्ता म्हणून कळंब-पाषाणे-वागंणी या रस्त्याची ओळख आहे.

नेरळ- वाहतुकीस कायम त्रासदायक असलेला रस्ता म्हणून कळंब-पाषाणे-वागंणी या रस्त्याची ओळख आहे. या रस्त्याची अवस्था बिकट असल्याने कर्जत एसटी डेपो आगाराने या मार्गावरील एसटी सेवा बंद केली आहे. आता रस्त्यावरील १३ किलो मिटर पर्यंतचे खड्डे भरण्यासाठी  मुरुम व मातीचा वापर करण्यात येत आहे.

कर्जत एसटी आगाराला तालुक्यातील  सर्वाधिक उत्पन्न देणारा मार्ग म्हणून कळंब-पाषाणे-वांगणी हा मार्ग ओळखला जातो. या मार्गावरील एसटी सेवा खराब रस्त्यामुळे कर्जत एसटी आगाराला बंद करावी लागली आहे.

एसटी बंद झाल्याने  विद्यार्थी आणि नोकरदारांचे हाल होत आहेत. चार वर्षापूर्वी या रस्त्यावर कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाने सव्वा कोटी रुपये खर्च केले होते. त्यातून तयार झालेला रस्ता पाच वर्षे देखिल टिकाव धरु शकत नाही.

स्थानिक ठेकेदार यांनी त्यावेळी रस्त्यावर खडीकरण आणि डांबरीकरण करताना अनियमितता केल्याने  रस्त्याची कामे व्यवस्थित झाली नाहीत. याच मुद्यावर  तीन वर्षापूर्वीची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढल्या गेल्या होत्या.

कोटी रुपये खर्च करून बनवलेला हा रस्ता दहा वर्ष टिकत नसेल तर मग सरकारी दक्षता आणि सनियंत्रण समितीने अशा ठेकेदार कंपनीला ठेके देवू नये अशी मागणी होत आहे. दरम्यान हे खड्डे भरण्यासाठी कर्जत सार्वजनिक बांधकाम विभाग १२ लाख खर्च करीत आहेत. पावसाळ्यात हे खड्डे लवकर भरुन या मार्गावरची वाहतूक पूर्ववत करण्याची मागणीही जोर धरत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version