Home महामुंबई येत्या सहा वर्षात सर्वच लोकल एसी

येत्या सहा वर्षात सर्वच लोकल एसी

0

एसी लोकलची वाट पाहणा-या मुंबईकरांची प्रतिक्षा आता संपणार असून येत्या काळात सर्वच लोकल एसी होणार आहेत.

मुंबई- एसी लोकलची वाट पाहणा-या मुंबईकरांची प्रतिक्षा आता संपणार असून येत्या काळात सर्वच लोकल एसी होणार आहेत. मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प ३ अंतर्गत मिळणा-या सर्वच लोकल ऑटोमॅटिक डोअर सिस्टीमच्या आणि वातानुकूलित असणार आहेत, अशी माहिती वरिष्ठ रेल्वे अधिका-याने दिली.

मेट्रो प्रमाणे असणा-या या गाडय़ांची किंमत ८० ते १०० कोटी रुपये असेल. २०२३ ते २०२४ पर्यंत या गाड्या मुंबईकरांच्या सेवेत येतील, अशी अपेक्षा आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गेल्या तीन वर्षात केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयासह रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांची बैठक घेतली. त्यानंतर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी पत्रकार परिषदेत विविध प्रकल्पांबाबत माहिती दिली.

एमयूटीपी-३ प्रकल्पाअंतर्गत मिळणा-या सर्व गाडय़ा मेट्रोच्या धर्तीवर वातानुकूलित असाव्यात, ही मागणी मान्य झाली आहे. या गाडय़ा मध्य रेल्वेच्या ताफ्यात सामील होण्यासाठी २०२३-२०२४ पर्यंत वाट पाहावी लागेल, असे रेल्वे अधिका-यांनी सांगितले.

मुंबई लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी कार्यालयीन वेळा बदलणे हा एक चांगला मार्ग आहे. त्यासाठी राईट्स या संस्थेतर्फे अहवाल तयार करण्यात येत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यात चर्चा झाल्याचीही माहिती आहे.

सर्व कार्यालये एकाच वेळी सुरू झाल्याने गर्दी होते. मात्र त्यात बदल केल्यास गर्दी कमी करणे सोपे होऊ शकेल, असा अहवाल देण्यात आला असून त्याबाबतचही मुख्यमंत्री फडणवीस आणि रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version