Home देश युपीएविरुद्ध तृणमूलची लढाई आता संसदेत

युपीएविरुद्ध तृणमूलची लढाई आता संसदेत

0

तृणमूल काँग्रेसने आता संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या विरोधात संसदेत लढा देण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली- तृणमूल काँग्रेसने आता संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या विरोधात संसदेत लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. तृणमूल संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संसदेत सरकारविरोधात स्थगन प्रस्ताव मांडणार आहे.

केंद्रातील युपीए सरकारच्या सामान्य जनतेविरोधातील निर्णयाविरुद्ध तृणमूलने नियम १८४नुसार स्थगन प्रस्ताव माडंणार आहे. याआधीच रिटेलमध्ये परकीय गुंतवणुक आणि पेट्रोल दरवाढीच्या मुद्दयावरुन तृणमूलने केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता.

केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात अनेक पक्ष आम्हाला पाठिंबा देतील असे तृणमूलचे लोकसभेतील नेते सुदीप बंडोपाध्ये यांनी सांगितले. संसदेतील कोणत्या पक्षांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे त्यांची नावे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version