Home मध्यंतर उमंग या हॉटेलातील ग्राहक खातात सोने

या हॉटेलातील ग्राहक खातात सोने

0

दुबईतील श्रीमंत शेख लोकांचा सोन्याचा हव्यास जगात परिचित आहे. त्यांचे सोने प्रेम नवे नसले तरी खाद्यपदार्थात त्याचा समावेश केला जात असेल याची आपल्याला कल्पना नाही. मात्र दुबईत आता अंगावर सोने घालण्याबरोबर ते खाण्याची क्रेझ वाढत आहे. येथील प्रसिद्ध हॉटेल बुर्ज अल अरबमध्ये नव्याने सुरू झालेल्या रेस्टॉरंटमध्ये केक, कॉकटेल, कॅपेचीनोसारख्या पदार्थामध्ये चक्क सोन्याचा वापर करण्यात येतो. या हॉटेलच्या २७व्या मजल्यावर हे गोल्ड ओं २७ रेस्टॉरंट आहे.

या हॉटेलचे मॅनेजर खारो सांगतात की, हॉटेलच्या सजावटीत शुद्ध सोन्याचा वापर केला गेला आहे, तसेच पदार्थात त्याचा वापर केला जात आहे. सोन्याला चव नाही हे खरे असले तरी लग्झरी आयुष्य म्हणजे काय हे दाखविण्याची ती एक पद्धत आहे.

दरवर्षी येथे ७०० ग्रँम सोने पदार्थात घालण्यासाठी वापरले जाते. येथील खास कॉकटेल एलिमेंट ७९ मध्ये अल्कोहोल नाही, मात्र वाईनमध्ये गोल्ड फ्लेक्स घातले जातात. त्यातील साखरेचे तुकडेही सोनेरी असतात. दरमहा किमान एक-दोन ग्राहक सोने कव्हर असलेला केक नेतात, तसेच कॅपीचीनोवर सोन्याचा थर दिला जातो.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version